‘छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती का साजरी करायची ?’, असा प्रश्न विचारणारे ‘आप’चे आमदार क्रूझ सिल्वा यांना पुरातत्व विभागाचे मंत्री सुभाष फळदेसाई यांचे सडेतोड उत्तर !
पणजी, २८ जुलै (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच गोव्यात पोर्तुगीज करत असलेल्या ‘इन्क्विझिशन’वर (धर्मच्छळावर) मोठ्या प्रमाणत आळा बसला. महाराजांमुळेच हिंदु समाजाचे रक्षण झाले. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती का साजरी करावी ?’, असा प्रश्न विचारणे मुळात चुकीचे आहे.
(सौजन्य : Dainik Gomantak TV)
अशा संवेदनशील विषयावरून बहुसंख्यांकांच्या भावना दुखावल्या जातील, असे कोणतेही विधान करू नये, असे पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी ‘आप’चे आमदार क्रूझ सिल्वा यांना सुनावले.
‘छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती का साजरी करावी ?’, असा प्रश्न ‘आप’चे आमदार क्रूझ सिल्वा यांनी विचारला होता. या प्रश्नावर मंत्री सुभाष फळदेसाई यांनी ही चेतावणी दिली.