कोणत्याही जातीचा उमेदवार देऊ; पण मुसलमान उमेदवार देणार नाही ! – के.एस्. ईश्‍वरप्पा, भाजप, ग्रामविकासमंत्री, कर्नाटक

आम्ही हिंदु समुदायातील कोणत्याही व्यक्तीला निवडणुकीचे तिकीट देऊ शकतो. कुरुबा, लिंगायत, वोक्कलिगा किंवा ब्राह्मण समाजातील कोणत्याही व्यक्तीला तिकीट देऊ; मात्र एक गोष्ट नक्की आहे की मुसलमानांना आम्ही तिकीट देणार नाही

स्वप्नील वाळके खून प्रकरणातील आरोपींवर आरोपपत्र प्रविष्ट

गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधीक्षक सी. एल्. पाटील यांनी २ सप्टेंबर २०२० या दिवशी झालेल्या स्वप्नील वाळके खून प्रकरणातील ६ आरोपींविरुद्ध मडगाव येथील प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट केले आहे.

गोवा शासनाने कोरोनाविषयक चाचण्यांचे प्रमाण पुन्हा वाढवले

राज्यातील कोरोना रुग्णांच्या प्रमाणात घट होत असली, तरी आरोग्य खात्याने कोरोनाविषयक चाचण्या करण्याचे प्रमाण वाढवले आहे. सध्या राज्यभर सरासरी २ सहस्र चाचण्या केल्या जात आहेत.

होमिओपॅथी महिला डॉक्टरला पतीकडून इस्लाम स्वीकारण्यासाठी बळजोरी

केंद्र सरकारने अशा घटनांच्या विरोधात संपूर्ण देशासाठी कायदा करणे आवश्यक !

अवैध पशूवधगृह चालकांवर तात्काळ कारवाई करण्याविषयी पाळधी (जळगाव) येथील ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

अवैध पशूवधगृह बंद करण्यासाठी ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ यांना निवेदन का द्यावे लागते ? प्रशासन स्वतःहून कृती का करत नाही ?

मुसलमान पतीकडून हिंदु पत्नीला उर्दू आणि अरबी शिकण्यासाठी दबाव अन् मारहाण

येथे हिंदु तरुणी ज्योती दहियाने महंमद इर्शाद खान याच्याशी विवाह केला होता. आता महंमद इर्शाद तिच्यावर उर्दू आणि अरबी भाषा शिकण्यासाठी दबाव टाकत असून त्यासाठी तिला मारहाण करत आहे.

सिंधुदुर्गातील सर्व न्यायालयांचे कामकाज आजपासून पूर्ववत् चालू होणार

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने घातलेल्या नियमांनुसार आतापर्यंत न्यायालयांचे कामकाज चालू होते. आता उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालय आणि तालुका न्यायालये १ डिसेंबरपासून सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पूर्ववत् चालू करण्यात येणार आहेत.

येत्या ४ वर्षांत राज्यातील पोलिसांसाठी १ लाख घरे बांधणार ! – अनिल देशमुख, गृहमंत्री

पोलिसांच्या घरांचा प्रश्‍न अतिशय महत्त्वाचा आहे. पुढील ४ वर्षांत राज्यातील पोलिसांसाठी १ लाख घरे बांधण्याचे नियोजन आम्ही करत आहोत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली.

सिंधुदुर्गातील कोरोनाबाधितांची स्थिती

गेल्या २४ घंट्यांत १९ नवीन रुग्ण आढळले.
आतापर्यंतचे एकूण कोरोनाबाधित रुग्ण ५ सहस्र २८५

गोव्यात पेडणे येथे ३ ठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये ३५ लाख रुपयांचे अमली पदार्थ कह्यात

गोव्यातील अमली पदार्थविरोधी पथकाने २९ नोव्हेंबरला पेडणे परिसरात वेगवेगळ्या ३ ठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये एकूण ३५ लाख रुपयांचे अमली पदार्थ कह्यात घेतले. अरंबोल, पेडणे या ठिकाणी टाकलेल्या धाडीमध्ये अमली पदार्थ बाळगल्याविषयी ३ व्यक्तींना अटक केली.