गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍यांवर सरकारने घातलेले निर्बंध योग्य ! – उच्च न्यायालय

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍यांवर सरकारने घातलेले निर्बंध योग्य असून त्यातून त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला.

‘इंस्टाग्राम’वर हिंदुद्वेष्टे अ‍ॅन्जियो फर्नांडिस याच्याकडून श्री गणेश आणि हिंदु देवता यांच्याविषयी अश्‍लील ‘पोस्ट’ प्रसारित

अशा गोष्टींविषयी तथाकथित धर्मनिरपेक्ष, पुरोगामी, चर्च किंवा तिच्याशी निगडित संस्था किंवा संघटना यांपैकी कुणीही तोंड उघडत नाही ! यावरून त्यांचा सर्वधर्मसमभाव किंवा धर्मनिरपेक्षता, ही बेगडी असते हे सिद्ध होते ! असे धर्मांधांच्या श्रद्धास्थानांविषयी झाले असते, तर बेंगळुरूमध्ये झाली तशी दंगल झाली असती.

निधन वार्ता

सनातन संस्थेचे साधक मनोहरपंत शंकरराव तेलसिंगे (दादा) (वय ८५ वर्षे) यांचे २० ऑगस्ट या दिवशी निधन झाले. ते हटकर कोष्टी समाजाचे शहराध्यक्ष होते.

कोरोनामुक्त झालेल्यांनी ‘प्लाझ्मा’ दान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन

‘प्लाझ्मा’ थेरपीमुळे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आता केवळ १४ ‘प्लाझ्मा’ शिल्लक आहेत. कोरोनापासून बरे झालेल्या रुग्णांनी ‘प्लाझ्मा’ दान करण्यासाठी पुढे यावे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६८ सहस्रांहून अधिक घरगुती, तर ३२ ठिकाणी सार्वजनिक मंडळांत श्री गणेशमूर्तींचे पूजन होणार

श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६८ सहस्रांहून अधिक घरगुती, तर ३२ ठिकाणी सार्वजनिक मंडळांत श्री गणेशमूर्तींचे पूजन होणार आहे. जिल्ह्यात श्री गणेशचतुर्थीपासून २१ दिवसांपर्यंत विविध कालावधींचा गणेशोत्सव साजरा केला जातो.

सावंतवाडीत श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव

सावंतवाडी नगरपरिषदेने शहरातील शिवउद्यानाजवळ श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माण केला आहे. सावंतवाडी शहरातील मोती तलावात प्रतिवर्षी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते.

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍याला कोरोनाची लागण

जिल्हा रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांची तपासणी करणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍याचा कोरोनाचा अहवाल सकारात्मक आला आहे.

पबजीच्या आहारी गेल्याने आंध्रप्रदेशातील १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

पबजी या खेळाच्या आहारी गेल्याने खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष होऊन एका १६ वर्षीय मुलाला जीव गमावावा लागल्याची धक्कादायक घटना आंध्रप्रदेशमध्ये घडली आहे. सतत खेळल्याने त्याच्या मेंदूवर गंभीर परिणाम झाल्याचे दिसून आले.

कोयना धरणाचे ६ वक्र दरवाजे १ फूट ९ इंचाने उघडले

कोयना धरणाचे ६ वक्र दरवाजे १५ ऑगस्ट या दिवशी सकाळी १ फूट ९ इंचाने उघडण्यात आले असून १० सहस्र ४१० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात चालू झाला आहे.

निधन वार्ता

सनातनच्या साधिका सौ. विजया दिलीप कळसकर यांचा मुलगा विश्‍वजीत दिलीप कळसकर (वय २७ वर्षे) यांचे हृदयविकाराने ५ ऑगस्ट या दिवशी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.