गृहविलगीकरण नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील ५ जणांवर गुन्हे नोंदवले !

गृहविलगीकरण नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर सांगली ग्रामीण, पलूस, भिलवडी, कडेगाव अशा विविध ठिकाणी कारवाई करून ५ जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.

श्री उदासीन कार्ष्णि आश्रमाचे श्री गुरु शरणानंद यांची हिंदु जनजागृती समितीकडून घेण्यात आली भेट !

हरिद्वार येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यात हिंदु जनजागृती समितीकडून चालवण्यात येत असलेल्या ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ अंतर्गत श्री उदासीन कार्ष्णि आश्रमाचे श्री गुरु शरणानंद यांची भेट घेण्यात आली.

अनिल देशमुख यांचे आज केंद्रीय अन्वेषण विभागाकडून अन्वेषण

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे १४ एप्रिल या दिवशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून अन्वेषण करण्यात येणार आहे. देशमुख यांना अन्वेषणासाठी समन्स दिले आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना उद्रेकाला जिल्हाधिकारी उत्तरदायी ! – हिना गावित, खासदार

जिल्ह्यात कोरोनाच्या उद्रेकाला जिल्हाधिकार्‍यांचे ढिसाळ नियोजन कारणीभूत आहे. अडीच सहस्र रेमडेसिविरची लस असतांना सामान्य नागरिकांना ते दिले नाही. यामुळेच कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यूदर वाढला आहे

हिंदु जनजागृती समितीचे हिंदु धर्म आणि संस्कृती रक्षणाचे कार्य प्रेरणादायी ! – श्री १००८ श्री कमलानंद गिरि

तुम्ही किती तळमळीने हे कार्य करत आहात, हे दिसत आहे. तुमच्या प्रबोधन केंद्राला अवश्य भेट देऊ, असे प्रतिपादन येथील श्री कल्याण कमल आश्रमाचे श्री १००८ श्री कमलानंद गिरि यांनी केले.

राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांविषयी साधूसंतांनी कृतीशील होणे, ही काळाची आवश्यकता ! – स्वामी सुरेश महाराज

स्वामी सुरेश महाराज यांनी ‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले आहे. या कार्याची समाजाला आवश्यकता आहे’, असे म्हटले. महाराजांना ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला भेट देण्याचे निमंत्रणही देण्यात आले.

पुणे येथील धर्मांध कंपाऊंडर नाव पालटून २ वर्षांपासून चालवत होता ‘मल्टीस्पेशालिटी’ रुग्णालय !

शिरूरमध्ये आधुनिक वैद्यांच्या हाताखाली काम करणार्‍या धर्मांध कंपांऊडरने बनावट नाव आणि वैद्यकीय पदवी सिद्ध करून स्वतःचेच २२ खाटांचे ‘मल्टीस्पेशालिटी’ रुग्णालय चालू केले आहे.

गरीब, कष्टकरी अशा ४ सहस्र लोकांना प्रत्येक दिवशी शिवभोजनाचा आधार !

कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिदिन ३ सहस्र ९३३ लोकांची शिवभोजन योजनेद्वारे क्षुधातृप्ती करण्यात येत आहे. केवळ ५ रुपयांत देण्यात येणारे हे भोजन कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर ‘पार्सल’ सेवेद्वारे पुरवण्यात येत आहे.

फायनान्स आस्थापनांचा मनमानी कारभार तात्काळ थांबवावा !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील अनेक व्यवसाय, व्यवहार ठप्प आहेत. यामुळे मजूर, नोकरदार, व्यावसायिक, व्यापारी अशा सर्वच वर्गांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लसीला भारतात वापर करण्यास संमती

भारतातील लस संबंधातील तज्ञ समितीने रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ या कोरोना प्रतिबंधात्मक लसीला भारतात वापर करण्यास अनुमती दिली आहे.