‘किसी का भाई किसी की जान’ या आगामी हिंदी चित्रपटातील गाण्यामध्ये मंदिराच्या आवारात चपला आणि बूट घालून अश्‍लील नृत्य !

सेन्सॉर बोर्ड चित्रपट पाहून प्रमाणपत्र देतांना हिंदूंच्या संदर्भातील अशा प्रकारच्या अवमानाच्या वेळी झोपलेले असते कि जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करते ?

वनक्षेत्र वाढ आणि जैवविविधता टिकवणे यांसाठी गोवा सरकार बांधील ! – मुख्यमंत्री

वर्ष २०१९ च्या तुलनेत वर्ष २०२१ च्या भारत सरकारच्या वन अहवालानुसार गोव्यातील वनक्षेत्रामध्ये ७ चौरस किलोमीटरची वाढ ! वनीकरण निधी व्यवस्थापन योजनेची कार्यवाही करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याने वनक्षेत्रात वाढ होत आहे.

गोवा : अडीच मासांत समुद्रकिनारी भागात रात्री ध्वनीप्रदूषण होत असल्याच्या प्रतिदिन सरासरी १०० तक्रारी

एवढ्या मोठ्या प्रमाणात तक्रारी करूनही पोलीस आणि प्रशासन अडीच मासांत ध्वनीप्रदूषण रोखू न शकणे ही त्यांची अकार्यक्षमता म्हणायची ? हतबलता समजायची कि यात भ्रष्टाचार आहे, असे समजायचे ?

ऋषिमुनींनी दिलेली वैश्विक सर्वसमावेशक सांस्कृतिक विचारधारा, हीच भारतीयता ! – केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान

भारताविषयी कुणाला भीती वाटत नाही; कारण आम्ही कितीही शक्तीवान झालो, तरी आमची संस्कृती आम्हाला दुसर्‍यांवर अतिक्रमण करण्याची शिकवण देत नाही.

उपकार्यकारी अभियंता आणि सनातन संस्थेचे साधक नीलेश नागरे यांनी कृषीपंप देयकांची १४ कोटींची केली विक्रमी वसुली !

सनातनचे साधक श्री. नीलेश नागरे यांनी स्वतः काही गावांमध्ये शेतकर्‍यांचे प्रबोधन केले. त्यांनी शेतकर्‍यांना वीजदेयक भरण्याचे महत्त्व पटवून दिले. याचा परिपाक म्हणून मार्चमध्ये शेतीपंप ग्राहकांनी स्वयंप्रेरणेने वीजदेयकांचे ६८ लाख रुपये भरले !

गोवा : खोतीगाव, गावडोंगरी परिसरातील डोंगरांना आग !

गेल्या मासात म्हादई अभयारण्याला लागलेली आग थांबवण्यासाठी शासनाला मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागले होते. त्यानंतर आता खोतीगाव आणि गावडोंगरी परिसरातील डोंगरांनाही आग लागली. अग्नीशमन दलाच्या साहाय्याने आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

दंगली रोखण्यासाठी योगी आदित्यनाथ यांचे धोरण केंद्र आणि सर्व राज्य सरकारे यांनी लागू करावे ! – समीर लोखंडे, उपाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा

देशाचे तुकडे करण्यासाठी ‘मिनी (छोटी) पाकिस्तान’ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. हिंदूंनी हनुमानाप्रमाणे बलोपासना करणे, ही काळाची आवश्यकता आहे. राज्यघटनेने प्रत्येकाला आत्मरक्षण करण्याचा अधिकार दिला आहे आणि त्याचा उपयोग करावा.

‘गीता प्रेस, गोरखपूर’चा शताब्दी उत्सव ऋषिकेश (उत्तराखंड) येथील गीता भवनमध्ये साजरा !

संगीतमय ‘रामचरितमानस’चा पाठ सहस्रो भाविक भावपूर्ण म्हणत असतांना तेथील वातावरणातील स्पंदने अधिक सकारात्मक जाणवत होती. त्यासह ते वातावरण पाहूनच भावजागृती होत होती.

९ एप्रिल या दिवशी होणारी हिंदु राष्ट्र-जागृती सभा पुढे ढकलली !

हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने रविवार, ९ एप्रिल २०२३ या दिवशी धरणगाव येथील बालकवी ठोंबरे विद्यालयाच्या शेजारील मैदानात हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे येथे ५० सहस्र रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणी साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांवर गुन्हा नोंद !

चोरी झालेली ‘इर्टिगा’ गाडी परत मिळवून देण्याकरता केलेल्या साहाय्याचा मोबदला म्हणून ५० सहस्र रुपयांची लाचेची मागणी करणारे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पवार यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पवार हे सिंहगड रस्ता पोलीस ठाणे येथे कार्यरत आहेत.