अवेळी पावसामुळे राज्यात शेती आणि फळपिके यांची मोठ्या प्रमाणात हानी !

राज्यात सलग दुसर्‍या दिवशी अवेळी पावसामुळे शेतीपिकाची मोठ्या प्रमाणात हानी झाली. यवतमाळ, हिंगोली, बुलढाणा, सांगली, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत पाऊस पडला. अनेक ठिकाणी वादळी पाऊस पडल्यामुळे घरांचीही हानी झाली.

मराठवाड्यात ८४ कोटी ७५ लाख रुपयांची हानी !

संपूर्ण मराठवाड्यात आतापर्यंत ८४ कोटी ७५ लाख रुपयांच्या हानीभरपाईचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले आहेत.

तक्रारदार आणि साक्षीदार फितूर असतांनाही अल्पवयीन युवतीवर अत्याचार करणार्‍या सद्दाम शहा याला २५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा !

साक्षीदार फितूर असतांनाही अल्पवयीन युवतीवर अत्याचार करणार्‍या सद्दाम शहा याला २५ वर्षे सक्तमजुरी आणि १५ सहस्र रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. ही शिक्षा अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश डी.एस्. हातरोटे यांनी सुनावली. या प्रकरणी जिल्हा सरकारी वकील माधव बी. कुलकर्णी यांनी काम पाहिले.

घराणेशाहीमुळे येणार्‍या हुकूमशाहीला भाजपने पूर्णविराम दिला ! – विनोद तावडे, राष्ट्रीय सरचिटणीस, भाजप

भाजपने या देशातील घराणेशाहीमुळे होणारे राजकारण आणि हुकूमशाही यांना पूर्णविराम दिला आहे. यापूर्वी राजकारणामध्ये प्रचंड घोटाळे आणि भ्रष्टाचार यांचे आरोप सत्ताधार्‍यांवर होत होते. गेल्या ९ वर्षांमध्ये असा कुठलाही आरोप केंद्रातील राजकारणात कुणावरही झालेला नाही.

अनधिकृत आधुनिक वैद्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी ! – सातारा जिल्हाधिकारी

अनधिकृत आधुनिक वैद्यांना शोधण्यासाठी तालुकास्तरावर समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्यांनी पोलीसदलाच्या साहाय्याने जिल्ह्यातील अनधिकृत आधुनिक वैद्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिले.

एरंडोल (जिल्हा जळगाव) येथील दुकानाच्या पत्त्यात मशिदीचा उल्लेख करण्यासाठी धर्मांधाचा दबाव !  

मुसलमानांच्या दुकानांवर बहिष्कार घातला असता, तर समस्त निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांनी आकाशपाताळ एक केले असते. ही टोळी आता कुठे आहे ?

खडकवासला (जिल्हा पुणे) येथे अर्धवट रस्त्याच्या कामामुळे दुचाकीचा अपघात होऊन तरुणाचा मृत्यू !

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर यांनी सांगितले की, अपघाताविषयी माहिती मिळाली असून नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याने अर्धवट कामे तातडीने पूर्ण करण्याविषयी कार्यवाही करण्यात येईल. 

‘फायरफ्लाय बर्ड डायव्हर्टर’ बसवण्याची आवश्यकता !

माळढोक पक्ष्यांच्या अधिवासातून जाणार्‍या विजेच्या तारांना ‘फायरफ्लाय बर्ड डायव्हर्टर’ हे यंत्र लावल्यास पक्षी विजेच्या तारांना धडकण्यापासून वाचू शकतात. विद्युत्वाहक तारांना लावलेल्या या यंत्रामुळे पक्षी सुमारे ५० मीटर अंतरावरून उड्डाणमार्ग पालटू शकतात. 

पुण्याजवळील ताम्हिणी अभयारण्यात अनधिकृत मजार !

अवैध बांधकाम होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? कि त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले ? याची चौकशी होऊन संबंधितांवर, तसेच हे अनधिकृत बांधकाम करणार्‍यांवर सरकारने कारवाई करावी !

श्रीरामनवमी जन्मोत्सव समितीच्या वतीने पलूस येथे शोभायात्रा !

श्रीरामनवमी जन्मोत्सव समितीच्या वतीने श्री धोंडिराज मंदिर येथे ३० मार्चला श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला, तसेच शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली.