मुसलमानांना विदेशातील सुरक्षेसंबंधीचे कठोर कायदे आणि नियम यांविषयी जाणीव करून देणे आवश्‍यक !

वास्‍तविक देशाच्‍या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्‍यक असलेल्‍या समान नागरी कायद्याविषयी विरोधकांचे प्रबोधन करणे आवश्‍यक आहे. यासह मुसलमानांना विदेशातील सुरक्षासंबंधीचे कठोर कायदे आणि नियम यांविषयी जाणीव करून दिली पाहिजे, असे मत महाराष्‍ट्र-गोवा बार कौन्‍सिलचे माजी सदस्‍य अधिवक्‍ता नंदू फडके यांनी व्‍यक्‍त केले.

सप्‍तशृंगी गडावरून एस्.टी. बस ४०० फूट दरीत कोसळून एका महिलेचा मृत्‍यू !

सप्‍तशृंगी गडावरून खाली येतांना एस्.टी. बस दरीत कोसळली. या अपघातात अमळनेर मुडी येथील आशाबाई राजेंद्र पाटील या महिलेचा मृत्‍यू झाला आहे. याच गावातील १३ प्रवासी असे एकूण १८ प्रवासी घायाळ झाले आहेत. घायाळांवर रुग्‍णालयात उपचार चालू आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श महिला नागरी सहकारी बँकेत २०० कोटींचा घोटाळा उघडकीस !

सहकारी संस्‍थेच्‍या जिल्‍हा उपनिबंधकांच्‍या आदेशावरून विशेष लेखापरीक्षक धनंजय चव्‍हाण यांनी वर्ष २०१६ ते २०१९ या कालावधीतील लेखापरीक्षण केले, तसेच जून २०२३ मध्‍ये त्‍यांनी याचा अहवाल वरिष्‍ठांकडे सादर केला.

मुंबई विद्यापिठाच्या विविध विभागांत ६१ टक्के पदे रिक्त !

मुंबई विद्यापिठाच्या विविध विभागांतील १३६ शिक्षकांची पदे भरण्यास शासनाकडून संमती मिळाली आहे. पदभरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.

जळगाव येथे ३३ गोवंशियांचे पाय बांधून त्यांची अवैध वाहतूक करणार्‍या तिघांना अटक !

पशूवैद्यकीय अधिकार्‍यांच्या तपासणीनंतर १३ गोवंशियांचा गुदमरल्याने श्‍वास कोंडला जाऊन मृत्यू झाल्याचे समोर आले. पोलिसांनी ट्रक जमा करून संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

कल्याण येथील आधारवाडी कारागृहात बंदीवानाकडे सापडले १५ भ्रमणभाष !

इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रमणभाष कारागृहात येतातच कसे ? बंदीवानांना पोलिसांचे पाठबळ मिळत असल्याची शक्यता नाकारता येत नाही !

देशात नक्षलवाद मागे पडला ! – नक्षलवाद्यांची स्वीकृती

जोपर्यंत देशातील नक्षलवाद आणि माओवाद समूळ नष्ट होत नाही, तोपर्यंत ‘नक्षलवाद्यांपासून देशाला धोका आहे’, हे शासकर्ते आणि पोलीस यंत्रणा यांनी लक्षात ठेवले पाहिजे.  

शाळा दुरुस्तीच्या कामांत वेळकाढूपणा करणार्‍यांची चौकशी करून कारवाई करा ! – रवींद्र चव्हाण, पालकमंत्री, सिंधुदुर्ग

प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीची १२६ कामे एकत्रितपणे का चालू केली नाहीत ?  शासकीय निधी आणि वेळ यांचा योग्य उपयोग व्हायला हवा. दुरुस्तीसाठी विलंब का लागला ? – रवींद्र चव्हाण, पालकमंत्री

सिंधुदुर्ग : सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात भरती करणार !

निवृत्त शिक्षकांना निवृत्तीवेतन असतांना २० सहस्र रुपये मानधन देऊन नेमण्यामागील उद्देश काय ? डी.एड्. झालेले बेरोजगार असतांना हा निर्णय का घेतला ?

वेगळ्‍या रहात असलेल्‍या पत्नीला उदरनिर्वाह भत्त्यासह ३ पाळीव श्‍वानांसाठीही पैसे देण्‍यास सांगितले !

यावर न्‍यायालयाने म्‍हटले की, पाळीव प्राणी हा एका सभ्‍य जीवनशैलीचा अभिन्‍न भाग आहे. मनुष्‍याच्‍या स्‍वस्‍थ जीवनासाठी पाळीव प्राणीही आवश्‍यक आहे, कारण नाती तुटण्‍यामुळे झालेल्‍या भावनिक दु:खाला अल्‍प करण्‍यासाठी ते साहाय्‍य करू शकतात….