कारागृह अधीक्षक निलंबित !
कल्याण – येथील आधारवाडी कारागृहात एका बंदीवानाकडे १५ भ्रमणभाष सापडले. या प्रकरणी कारागृह प्रशासनाने ठोस कारवाई न केल्याने चौकशीअंती आधारवाडी कारागृहाचे अधीक्षक अंकुश सदाफुले यांना निलंबित करण्यात आले. सदाफुले यांचे नुकतेच स्थानांतर झाले आहे. बंदीवान लपूनछपून भ्रमणभाषचा वापर करतात. तो त्यांना कुठून आणि कसा पुरवला जातो ?, याचे अन्वेषण होत नाही.
15 mobile phones recovered from Kalyan Jail. Superintendent Ankush Sadafule suspended. Prisoners were being supplied with Android mobiles for ₹50,000, sources said. Liquor & drugs were also being sold in the jail, it is alleged. pic.twitter.com/zXFY4a5jVC
— MUMBAI NEWS (@Mumbaikhabar9) July 12, 2023
यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना सदाफुले म्हणाले, ‘‘मला सेवेत बढती मिळणार होती; पण त्यापासून मला वंचित ठेवण्यासाठी ही कारवाई झाली आहे. माझे स्थानांतर झाल्यानंतर १०-१५ दिवसांनी बंदीवानाकडे भ्रमणभाष सापडले होते. हा माझ्यावर अन्याय आहे.’’
कल्याणच्या आधारवाडी कारागृहात कैंद्याकडे 15 मोबाईल सापडल्याने एकच खळबळ उडालेयhttps://t.co/SrCcBtUtpg
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 12, 2023
संपादकीय भूमिकाइतक्या मोठ्या प्रमाणात भ्रमणभाष कारागृहात येतातच कसे ? बंदीवानांना पोलिसांचे पाठबळ मिळत असल्याची शक्यता नाकारता येत नाही ! |