‘ईडी’कडून ८ सहस्र पानांचे आरोपपत्र प्रविष्ट !   

‘जंबो कोविड सेंटर’ घोटाळ्यात आर्थिक अपव्यवहार झाल्याचा आरोप ‘ईडी’कडून करण्यात आला होता. यात सुजित पाटकर यांना अनधिकृतरित्या कंत्राट दिले गेल्याचा दावा करण्यात आला, तसेच बनावट देयके दाखवून अतिरिक्त लाभ मिळवला गेला, असा आरोप सुजित पाटकर आणि आधुनिक वैद्य बिसुरे यांच्यावर करण्यात आला आहे.

राज्यातील एकही शाळा बंद करणार नाही ! – दीपक केसरकर, शिक्षणमंत्री

‘‘अंगणवाडी, शिशु गट, वरिष्ठ शिशु गट, पहिली आणि दुसरी अशी ५ वर्षे ‘प्री-प्रायमरी’मध्ये घेतली जाणार आहेत. नव्या शैक्षणिक धोरणाच्या कार्यवाहीसाठी माहिती मागवली जात आहे.

पुणे येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत आवाजाची मर्यादा ओलांडली !

श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बी (आधुनिक इलेक्ट्रॉनिक ध्वनीक्षेपक यंत्रणा) ध्वनीवर्धक, ढोल-ताशांच्या आवाजाने ध्वनीप्रदूषणाची पातळी ओलांडली.

श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत मारामारी !

सहकारनगरमधील तळजाई भागात जुन्या वादातून ‘शेंडी’ आणि ‘सूर्या’ टोळींमध्ये मारामारी झाली.

पिंपरी-चिंचवड येथे बालकाचा मृत्यू !

मोशी येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन चालू असतांना अर्णव आशिष पाटील या ४ वर्षांच्या मुलाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला.

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे केवळ ३ वर्षांसाठी दिली जाणार !

ही वाघनखे नोव्हेंबरमध्ये मुंबईत आणली जातील. ती मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, तसेच सातारा, नागपूर आणि कोल्हापूर येथील संग्रहालयांत प्रदर्शित केली जाणार आहेत.

हिंदूंनो, हिंदुत्वाच्या हितासाठी स्वत: कार्य करा ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

एक समाज असा आहे, जो आपले म्हणणे सरकारच्या गळी उतरवतो. सत्तेत हिंदू असूनही या लोकांच्या विचाराने सरकार चालते. आपला देश कुणी आतंकवादी चालवत नाहीत, तरीही हिंदुविरोधी भूमिका का घेतली जाते ? मंदिरांचे सरकारीकरण कुणी केले आहे ? सरकार मशिदी कह्यात का घेत नाहीत ?

सोलापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर गणेशभक्तांकडून नैसर्गिक जलस्रोेतात विसर्जनास प्राधान्य !

शास्त्रानुसार कृती करणेच श्री गणेशाला अपेक्षित आहे, हे लक्षात घेऊन प्रत्येकच कृती अध्यात्मशास्त्रानुसार करावी !

नाशिक येथील शाळेच्या आवारात गौतमी पाटील हिच्या अश्‍लील नृत्याचा कार्यक्रम !

शाळेच्या आवारात अश्‍लील नृत्यासाठी कुप्रसिद्ध असणार्‍या नृत्यांगनेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणे, हे नैतिकतेचे झालेले हननच होय !

सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये २ गट पडल्याचे उघड

जिथे काँग्रेसमध्येच २ गट आहेत, तेथे २८ राजकीय पक्षांची ‘इंडिया’ आघाडी एकसंध असणे शक्य तरी आहे का ?