नाशिक येथील शाळेच्या आवारात गौतमी पाटील हिच्या अश्‍लील नृत्याचा कार्यक्रम !

शिक्षणाधिकार्‍यांकडून चौकशीचे आदेश !  

गौतमी पाटील

नाशिक – जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वलखेड गावात एका गणेशोत्सव मंडळाने लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या अश्‍लील नृत्याचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या शाळेतील आवारात आयोजित केला होता. या कार्यक्रमाला पुष्कळ गर्दी होती. शाळेच्या आवारात कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी गट शिक्षणाधिकार्‍यांनी चौकशीचा आदेश दिला आहे.

शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या शाळेत अशा कार्यक्रमांना अनुमती नसून केवळ सांस्कृतिक कार्यक्रम येथे होऊ शकतात; मात्र सांस्कृतिक कार्यक्रम कोणते असावेत, याचे भान बाळगणे महत्त्वाचे आहे. असा काही कार्यक्रम झाला असल्यास हे धक्कादायक आहे. स्थानिक गटशिक्षण अधिकार्‍यांनी चौकशी चालू केली आहे. संबंधित चौकशीचा अहवाल पुढे पाठवण्यात येऊन संबंधितांवर कारवाई केली जाईल.

सौजन्य : Zee 24 Taas 

संपादकीय भूमिका

  • शाळेच्या आवारात अश्‍लील नृत्यासाठी कुप्रसिद्ध असणार्‍या नृत्यांगनेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणे, हे नैतिकतेचे झालेले हननच होय !