सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये २ गट पडल्याचे उघड

समीर वंजारी यांच्या नियुक्तीमुळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संतप्त

काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख (उजवीकडील) आणि श्री. समीर वंजारी प्रभारी जिल्हाध्यक्ष

सावंतवाडी : काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांना पदावरून तडकाफडकी हटवून त्यांच्या जागी समीर वंजारी यांची प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली होती. या घटनेमुळे जिल्हा काँग्रेसमध्ये २ गट पडले. वंजारी यांच्या नियुक्तीमुळे अप्रसन्न झालेले काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी त्यांच्या पदांचे सामुदायिक त्यागपत्र दिले, तसेच याविषयी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र विधीमंडळाचे पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही अवगत करण्यात आले.

अशा प्रकारे स्थानिक कार्यकर्त्यांना विचारात न घेता नियुक्ती करण्यात आल्याने स्थानिक कार्यकर्ते संतप्त झाले होते. अखेर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना त्याची नोंद घ्यावी लागली आणि त्यामुळे वंजारी यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. आता पुन्हा शेख काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पहाणार आहेत.

संपादकीय भूमिका

जिथे काँग्रेसमध्येच २ गट आहेत, तेथे २८ राजकीय पक्षांची ‘इंडिया’ आघाडी एकसंध असणे शक्य तरी आहे का ?