मद्यार्कपासून हवाई इंधन बनवणार्‍या पहिल्या पथदर्शी तंत्रज्ञान प्रकल्पाचे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या हस्ते पुणे येथे उद्घाटन !

या प्रकल्पातून शाश्वत जैविक हवाई इंधन अर्थात् ‘एस्.ए.एफ्.’ची निर्मिती होणार आहे. पुण्याजवळील पिरंगुट औद्योगिक वसाहतीमधील प्राज उद्योग समुहाच्या संशोधन आणि विकास विभागात हा पथदर्शी प्रकल्प उभारण्यात आला आहे.

फेब्रुवारी संपण्यापूर्वी कामाच्या निविदा काढण्याचे पुणे आयुक्तांचे आदेश !

मार्च मासात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने महापालिकेची कामे मार्गी लागावीत, यासाठी आयुक्त विक्रमकुमार यांनी कामांचा आढावा घेतला.

२२ जानेवारी हा दिवस ‘मर्यादा पुरुषोत्तमदिन’ घोषित करा !

श्रीराम हिंदूंचे श्रद्धास्थान आहेत. समस्त हिंदू श्रीरामाला ‘मर्यादा पुरुषोत्तम’ मानतात. त्यामुळे समस्त हिंदूंच्या धारणेस अनुसरून हिंदु जनभावनांचा आदर राखण्यासाठी केंद्र सरकारने २२ जानेवारी हा दिवस ‘मर्यादा पुरुषोत्तमदिन’ म्हणून घोषित करावा.

१७ वर्षांपासून अडीच कोटी श्रीराम नामजप लिहिणार्‍या कौशल्या सांगलेआजी !

सांगले परिवारातील कौशल्याआजी या वर्ष २००७ पासून अखंडपणे रामनाम लिहित आहेत. त्यांनी लिहिलेल्या ८५० वह्या जपाने भरलेल्या आहेत. त्यांच्या या कृतीतून त्यांनी इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे.

श्रीरामललांच्या २१ फुटी प्रतिमेच्या अनावरणानंतर विविध कार्यक्रम !

या प्रतिमेचे अनावरण रास्ते श्रीराम मंदिराचे प्रमुख विश्वस्त सरदार कुमारराजे रास्ते यांनी केले. मंदिरात ५ दिवस रामरक्षास्तोत्र पठण, तसेच विविध कार्यक्रम झाले. प्रतिष्ठापनेच्या दिवशी श्री दत्त याग झाला.

राज्यातील प्रत्येक तालुक्यासाठी एक शववाहिका खरेदी करणार !

राज्यातील २५ महापालिका क्षेत्रांत काही प्रमाणात मृतदेह वाहून नेण्यासाठी व्यवस्था आहे; मात्र तालुकास्तरावर, तसेच आदिवासी भागात लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात.

पश्चिम रेल्वेकडून अयोध्या येथील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण !

रेल्वे स्थानकातील ४० आणि मुंबई लोकलमधील ९६० मोठ्या पडद्यांचा (‘स्क्रीन्स’चा) समावेश होता.

संघर्षाचा सामना करून त्यावर विजय मिळवण्याची प्रेरणा वनवासात गेलेले श्रीराम देतात ! – डॉ. कुमार विश्वास, प्रसिद्ध रामकथाकार

डॉ. कुमार विश्वास पुढे म्हणाले की, कठीण प्रसंगातून मार्ग कसा काढावा, याची शिकवण रामायण देते. जेव्हा जग प्रतिकूलतेशी संघर्ष करत असेल, निराशेच्या वातावरणात जगात असेल, तेव्हा सूर्यवंशी भगवान श्रीराम मार्ग दाखवत रहातात.

भगवे ध्वज, श्रीरामाचा जयघोष यांमुळे करवीरनगरी श्रीराममय !

अयोध्येतील श्रीराममंदिरातील प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला म्हणजे २१ जानेवारीला सकल हिंदु समाजाच्या वतीने कोल्हापूर शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. भगवे ध्वज, श्रीरामाचा जयघोष यांमुळे करवीरनगरी श्रीराममय झाली होती.

Atal Setu : ‘अटल सेतू’वर पान किंवा गुटखा खाऊन थुंकल्याच्या खुणा आढळल्या !

स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही राजकारण्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम ! सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यासारख्या घटना घडणे विश्‍वगुरुपदाकडे वाटचाल करणार्‍या भारतासाठी लज्जास्पद !