पुणे – ‘श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट’च्या वतीने २१ फुटी प्रभु श्रीरामललांची प्रतिमा बुधवार पेठेतील मंदिरावर विराजमान करण्यात आली. या प्रतिमेचे अनावरण रास्ते श्रीराम मंदिराचे प्रमुख विश्वस्त सरदार कुमारराजे रास्ते यांनी केले. मंदिरात ५ दिवस रामरक्षास्तोत्र पठण, तसेच विविध कार्यक्रम झाले. प्रतिष्ठापनेच्या दिवशी श्री दत्त याग झाला. अनाथ मुलांना स्वेटर आणि भोजन देण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दत्त महाराजांची आरतीही झाली. या सोहळ्यास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.