रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सूर्योदयाच्या मंगलसमयी गुढीपूजन !

हिंदु नववर्षारंभानिमित्त म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने सनातनच्या रामनाथी गोवा आणि देवद पनवेल येथील आश्रमात गुढीपूजन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. सूर्योदयाच्या वेळी मंगलमय वातावरणात विधीवत्  गुढीपूजनानंतर पंचांगस्थ गणपतिपूजन आणि नूतन संवत्सरफलश्रवण करण्यात आले.

कोरोनावर मात करून विजयाची गुढी उभारूया ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र भगवामय होऊन जातो. ढोल-ताशे आदी वाद्यांचा गजर होतो; मात्र आज महाराष्ट्र शांत आहे. आपणाला गुढीपाडवा अवश्य साजरा करायचा आहे. यंदा कोरोनाच्या संकटावर मात करून विजयाची गुढी उभारूया

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १२२ वर ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

२ दिवसांत राज्यात कोरोनाचे २५ रुग्ण आढळले असून राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता १२२ वर पोचली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

कोरोनाविषयीची माहिती भ्रमणभाषवर उपलब्ध ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

कोरोनाने जगात थैमान घातले आहे; मात्र अनेकांना त्याच्याविषयी व्यवस्थित माहिती नाही. कोरोनाविषयीची वस्तूनिष्ठ माहिती देण्यासाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅट बॉट’ हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. याद्वारे आता एका ‘क्लिक’वर ही माहिती मिळणार आहे.

रुग्णसेवा नाकारल्यास खासगी रुग्णालयाचे अनुमतीपत्र रहित करण्यात येईल ! – राजेंद्र पाटील-यड्रावकर, आरोग्य राज्यमंत्री

काही आधुनिक वैद्य आणि खासगी रुग्णालये त्यांच्या ‘ओपीडी’मध्ये येणार्‍या रुग्णांवर उपचार करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी शासनाकडे येत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने कोरोना ही मोठी आणीबाणी भारत देशावर आलेली आहे.

विदेश दौर्‍याची माहिती शासनाला न दिल्याने हिंगोली येथे एकावर गुन्हा नोंद

विदेश दौर्‍याची माहिती लपवल्याच्या प्रकरणी येथील धामणगाव परिसरात रहाणार्‍या एका ६५ वर्षीय व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी येथील ग्रामसेवक पंजाबराव मोरे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेत पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती.

मुंबईत कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणार्‍या ११२ जणांवर गुन्हे नोंद

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून राज्यात १४४ कलमान्वये संचारबंदी आणि जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. असे असतांना या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या शहरातील ११२ जणांवर पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत.

नागपूर येथे युवतीवर सामूहिक अत्याचार करणार्‍या ५ जणांना अटक

मित्रासमवेत दुचाकीवरून कुही येथे जाणार्‍या युवतीवर सामूहिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रस्त्यात दुचाकी बंद पडली असता तेथे आलेल्या ५ जणांपैकी तिघांनी युवतीवर सामूहिक अत्याचार केले.

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मुद्रित माध्यमे बंद !

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षिततेचा एक भाग म्हणून मुद्रित माध्यमांच्या वितरकांनी त्यांचे वितरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने गुढीपाडव्यापासून सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मुद्रित माध्यमे बंद करण्यात आली आहेत.

घरफोडी करणार्‍या धर्मांधाला अटक

दिवसा दुचाकीवर फिरून बैठ्या आणि बंद घरांची पहाणी करून रात्रीच्या वेळी घरफोडी करणार्‍या गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून १५ लाख १३ सहस्र १५० रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन करण्यात आला आहे.