सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मुद्रित माध्यमे बंद !

‘कोरोना’ विषाणूचा परिणाम !

कोल्हापूर, २५ मार्च (वार्ता.) – कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षिततेचा एक भाग म्हणून मुद्रित माध्यमांच्या वितरकांनी त्यांचे वितरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने गुढीपाडव्यापासून सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मुद्रित माध्यमे बंद करण्यात आली आहेत. २५ मार्चपासून सर्व माध्यमे ‘घरून काम’ आणि ‘इ आवृत्ती’ यांनुसार कार्यरत आहेत. बहुदा स्वातंत्र्यानंतर आणीबाणीचा काळ सोडला, तर इतके दिवस मुद्रित माध्यमे बंद असल्याचा हा पहिलाच प्रसंग असावा. अनेक दैनिकांनी त्यांच्या बहुतांश वार्ताहरांना घरूनच काम करण्यास सांगितले आहे. यामुळे दैनिक हाती घेऊन वाचणार्‍या वाचकांचा मात्र मोठ्या प्रमाणात हिरमोड झाला आहे.