घरफोडी करणार्‍या धर्मांधाला अटक

गुन्हेगारांना कठोर शासन केल्यास अशा कुकृत्यांना आळा बसेल !

पुणे – दिवसा दुचाकीवर फिरून बैठ्या आणि बंद घरांची पहाणी करून रात्रीच्या वेळी घरफोडी करणार्‍या गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून १५ लाख १३ सहस्र १५० रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड मधील तीन, तर पुणे शहरातील ११ गुन्हे उघडकीस आले आहेत. रफिक हुसेन शेख (वय २६ वर्षे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याने २ ठिकाणी वाहन चोरीही केल्याचे सांगितले. पोलिसांनी सांगवी परिसरात सापळा रचून शेख याला अटक केली.