नागपूर येथे युवतीवर सामूहिक अत्याचार करणार्‍या ५ जणांना अटक

दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ होणे चिंताजनक !

नागपूर – मित्रासमवेत दुचाकीवरून कुही येथे जाणार्‍या युवतीवर सामूहिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रस्त्यात दुचाकी बंद पडली असता तेथे आलेल्या ५ जणांपैकी तिघांनी युवतीवर सामूहिक अत्याचार केले. या प्रकरणी गुन्हा नोंद केल्यानंतर १२ घंट्यांच्या आत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पंकज कुथे, आकाश लेंडे, सुनील उपाख्य सुमीत गवळी, सूरज मने आणि चंद्रशेखर कडव या ५ आरोपींना अटक केली.