नागपूर येथे उमेदवाराचे अपहरण करून त्याला अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा नोंद

 ग्रामपंचायत निवडणुकीतील अनागोंदी !

कोरोना काळातील वीजदेयके माफ करण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरात भव्य वाहन मोर्चा

कोरोना काळातील वीजदेयके माफ करावीत, या मागणीसाठी येथे भव्य वाहन मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यामध्ये २५० हून अधिक रिक्शा, २०० हून अधिक ट्रक आणि खासगी गाड्या सहभागी झाल्या होत्या.

पुणे येथील माजी जिल्हा परिषद सदस्याच्या भावावर धर्मांधांचे आक्रमण

माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांचा चुलतभाऊ शेखर पारगे यांच्या डोणजे (ता. हवेली) येथील जिव्हाळा फार्महाऊसवर ५ जानेवारी या दिवशी पहाटे २ वाजता कोयत्याने आक्रमण करण्यात आले.

राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांतील आधुनिक वैद्य ११ जानेवारीला संपावर जाणार

राज्यातील शेकडो वैद्यकीय अधिकारी आणि आधुनिक वैद्य संपावर गेल्यास आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा

कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला.

निधन वार्ता

सनातन संस्थेच्या ६४ टक्के अध्यात्मिक पातळी असलेल्या साधिका श्रीमती नंदिनी जोशी (वय ८१ वर्षे) यांचे ७ जानेवारी या दिवशी पहाटे ३.३० वाजता निधन झाले. त्यांच्या पश्‍चात मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

शेतकर्‍यांच्या लाभाच्या विधेयकाला राजकारणासाठी विरोध केला जात आहे ! – भाजप नेत्यांचे प्रतिपादन

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला विरोधी पक्षांकडून विरोध होत असतांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे भाजपच्या वतीने या विधेयकाच्या समर्थनार्थ  ‘ट्रॅक्टर मोर्चा’ काढण्यात आला.

दैनंदिन व्यवहारात जिल्ह्यातील कार्यालयांतून मराठीचा वापर करण्याची सक्ती करा ! – मनसेची मागणी

जिल्ह्यातील काही बँकांचे आणि संस्थांचे अधिकारी अन् कर्मचारी परप्रांतीय असून त्यांना मराठी भाषा बोलता येत नाही. ते हिंदीत संभाषण करत असल्याने त्याचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा अधिकारी आणि कर्मचार्‍यांना दैनंदिन व्यवहारात मराठीत बोलण्याची सक्ती करा……

गिरणी कामगारांना मुंबईमध्ये तातडीने घरे उपलब्ध करून द्यावी ! – नाना पटोले, अध्यक्ष, विधानसभा

गिरणी कामगारांना मुंबई शहरामध्येच भूमी उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन करावे- नाना पटोले

मिरज-पुणे रेल्वेमार्गाची रेल्वे प्रबंधक रेणु शर्मा यांच्याकडून पहाणी !

पॅसेंजर गाड्या चालू करण्याची रेल्वे प्रशासनाची सिद्धता असून महाराष्ट्र शासनाने अनुमती दिल्यास त्या चालू करू