हेमंत नगराळे यांच्याकडे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदाचा कार्यभार

हेमंत नगराळे हे वर्ष १९८७ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. त्यांनी वर्ष १९९८ ते २००२ या कालावधीत केंद्रीय अन्वेषण यंत्रणेमध्येही काम केले. प्रारंभी मुंबई येथे, त्यानंतर देहली येथे उपमहासंचालकपदाचे दायित्व त्यांनी यशस्वीरित्या पार पाडले.

‘रामराज्य’ अर्थात् ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी श्रीरामभक्तांकडून ट्विटरवर ट्रेंडद्वारे संकल्प

श्रीरामजन्मभूमीवर श्रीरामंमदिर बांधण्याची वाट मोकळी झाली आणि तेथे मंदिराच्या उभारणीसाठी भूमीपूजनही करण्यात आले; मात्र हिंदूंनी श्रीराममंदिर उभारण्यापर्यंत सीमित न रहाता प्रभु श्रीरामाला अपेक्षित असे ‘रामराज्य’ आणण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करणे आवश्यक आहे.

जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाच्या परिसरामध्ये २०० एकर जागेत भीषण आग

तालुक्यातील माडबन परिसरातील प्रस्तावित जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाच्या परिसरामध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. या भडकलेल्या आगीमध्ये २०० एकर जागेतील गवत जळून खाक झाले आहे.

कोरोनाचा प्रभाव उणावूनही शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती ४२ टक्के !

जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार उणावला असला, तरी कोरोनाविषयीची भीती अल्प होत चालली आहे. परिणामी जिल्ह्यातील शाळा मोठ्या प्रमाणात चालू झाल्या आहेत. मात्र, शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती ४२.४२ टक्के एवढीच आहे.

धान्य खरेदीसाठी १ लाख बारदाने शासनाने पुरवावीत ! – सतीश सावंत

वर्ष २०२०-२१ च्या धान्य खरेदीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला १ लाख बारदानांची (पोत्यांची) आवश्यकता आहे. शासनाने ही बारदाने पुरवावीत, अशी मागणी राज्याचे सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केली आहे.

कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम

कोरोना लसीकरणात कोणत्याही उणिवा राहू नयेत, यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणाविषयीची रंगीत तालीम घेण्यात आली. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी याप्रसंगी भेट देऊन रुग्णालयातील सिद्धतेचा आढावा घेतला.

नगर येथील तत्कालीन नगरसेवक श्रीपाद छिंदम यांचे नगरसेवकपद रहित करण्याचा निर्णय संभाजीनगर खंडपिठाने वैध ठरवला !

नगर महापालिकेचे श्रीपाद शंकर छिंदम यांनी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अनुद्गार काढले होते.

राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्‍न जाणून-बुजून प्रलंबित ठेवण्यात आला आहे ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर करावे, अशी मागणी आहे. यावर भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी.

महिला पोलिसावर प्राणघातक आक्रमण करणार्‍या चौघांविरोधात गुन्हा नोंद

जिथे महिला पोलीसच असुरक्षित असतील, तिथे सर्वसामान्य महिलांची काय स्थिती असेल ?

काँग्रेसच्या विरोधाला न जुमानता मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विटरवर संभाजीनगर नावाचा वापर चालू !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासकीय ट्विटरवर काँग्रेसच्या विरोधास आपण जुमानत नाही, हे दाखवून दिले आहे.