शेळ-मेळावली येथील आय.आय.टी. प्रकल्प रहित करा ! – विश्‍वजित राणे

आरोग्यमंत्री आणि सत्तरी तालुक्याचे आमदार विश्‍वजित राणे यांनी शेळ-मेळावली येथील नियोजित आय.आय.टी. प्रकल्पाला असलेला त्यांचा पाठिंबा काढून हा प्रकल्प रहित करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

मांगोरहिल, वास्को येथील श्री अय्यप्पा मंदिरातील महोत्सवाला आजपासून प्रारंभ

मांगोरहिल येथील श्री अय्यप्पा मंदिरात १३ ते २० जानेवारी या कालावधीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत !  डॉ. बांदेकर, अधिष्ठाता, गोमेकॉ

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत, असे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बांदेकर यांनी सांगितले.

मये येथील ग्रामस्थांना सनद देण्याची प्रक्रिया मार्गी लावण्याची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची डिचोलीच्या जिल्हाधिकार्‍यांना सूचना

‘‘उत्तर गोवा जिल्हा कार्यालयाच्या साहाय्याने डिचोली उपजिल्हाधिकारी कार्यालयाने मये येथील ग्रामस्थांना मालमत्तेचा अधिकार देण्याची प्रक्रिया चालू केली आहे.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘फेस्टिव्हल कॅलिडोस्कोप’ मध्ये १२ चित्रपट प्रदर्शित होणार

या चित्रपटांमध्ये ‘नाईट ऑफ द किंग्स्’, ‘लव्ह अफेअर्स’ आणि ‘द बिग हिट’ हे फ्रान्समधील चित्रपट दाखवण्यात येतील.  जगभरातील चित्रपटांमधून उत्कृष्ट आणि निवडक असे चित्रपट ‘कॅलिडोस्कोप’ या विभागात दाखवण्यात येतात.

कळंगुट येथील श्री शांतादुर्गा नासनोडकरीण देवस्थानच्या जागेत मलनिःसारण प्रकल्प उभारण्यास स्थानिकांचा विरोध

‘कळंगुट येथे झालेल्या बैठकीत देवस्थानच्या जागेत मलनिःसारण प्रकल्प उभारण्याविषयी सर्वानुमते विरोध करण्यात आला. देवस्थानने आक्षेप घेऊनही शासनाने ही भूमी कह्यात घेतल्याचे देवस्थानच्या सदस्यांनी सांगितले.

इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टीव्हलसाठी सनबर्न आयोजकांकडून पुन्हा अर्ज दाखल

इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टीव्हलच्या (सनबर्नच्या) आयोजकांनी २७ मार्चपासून ३ दिवस सनबर्न आयोजित करण्याविषयी अनुमती मागण्यासाठी पर्यटन खात्याकडे पुन्हा अर्ज केला आहे.

बर्ड फ्ल्यूच्या पार्श्‍वभूमीवर दक्षिण गोव्यात कोंबड्या आणि अंडी यांच्या प्रवेशास किंवा वाहतुकीस मनाई

दक्षिण गोवा अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांनी दक्षिण गोव्यात  महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतून कोंबड्या अन् इतर पक्षी आणि त्यांची अंडी यांच्या वाहतुकीस किंवा प्रवेशास एका आदेशाद्वारे मनाई केली आहे.

गोव्यात दिवसभरात ९२ कोरोनाबाधित

गोव्यात गेल्या २४ घंट्यांत नवीन ९२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. त्याचप्रमाणे ९४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या वाहनाला भीषण अपघात

केंद्रीय आयुषमंत्री (स्वतंत्र कार्यभार) श्रीपाद नाईक यांच्या वाहनाला कर्नाटकातील अंकोला येथे भीषण अपघात झाला असून त्यांच्या पत्नी आणि स्वीय सचिव यांचा मृत्यू झाला आहे, तर श्रीपाद नाईक यांची प्रकृती गंभीर आहे.