इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टीव्हलसाठी सनबर्न आयोजकांकडून पुन्हा अर्ज दाखल

पणजी, १२ जानेवारी (वार्ता.) – इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टीव्हलच्या (सनबर्नच्या) आयोजकांनी २७ मार्चपासून ३ दिवस सनबर्न आयोजित करण्याविषयी अनुमती मागण्यासाठी पर्यटन खात्याकडे पुन्हा अर्ज केला आहे. याविषयी पर्यटन खात्यातील ज्येष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले की, पर्यटन खात्याने याविषयी अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. यासंबंधी आयोजकांकडून अजून काही माहिती मागवण्यात आली आहे.

यापूर्वी आयोजकांकडून डिसेंबर महिन्यात हा उत्सव आयोजित करण्याची अनुमती घेण्यात आली होती. ‘हा मोठा कार्यक्रम असल्याने कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर लोकांची गर्दी होईल’, अशी टीका झाल्याने नोव्हेंबर महिन्यात शासनाने या उत्सवाला दिलेली अनुमती रहित केली होती.