गोव्यात दिवसभरात ९२ कोरोनाबाधित

पणजी – गोव्यात गेल्या २४ घंट्यांत नवीन ९२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. त्याचप्रमाणे ९४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या राज्यात ७९७  रुग्णांवर उपचार चालू  आहेत. आतापर्यंतची मृतांची संख्या ७४९ आहे.