पणजी, १२ जानेवारी (स.प.) – दक्षिण गोवा अतिरिक्त जिल्हाधिकार्यांनी दक्षिण गोव्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतून कोंबड्या अन् इतर पक्षी आणि त्यांची अंडी यांच्या वाहतुकीस किंवा प्रवेशास एका आदेशाद्वारे मनाई केली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर भा.दं.सं.च्या कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल, असे माहिती आणि प्रसिद्धी खात्याने कळवले आहे. देशातील ९ राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचे संक्रमण झाले आहे. यात महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांचा समावेश आहे. येथील कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू (Avian Influenza (H5N1)) झाला आहे. या आदेशाची कार्यवाही तात्काळ होणार आहे.