अंनिसला नक्षलवादी संघटना घोषित करा ! – अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था

श्री. अभय वर्तक

पुणे – भारतातील ५० नक्षलवादी संघटनांच्या सूचीत दाभोलकरांच्या अंनिस संघटनेचे नाव अंतर्भूत आहे. पूर्वी प्रसारित झालेला या विषयाचा अहवाल काढावा आणि अंनिसला नक्षलवादी संघटना म्हणून घोषित करावे. अंनिस संघटना विदेशातून पैसे घेऊन भारतीय संस्कृतीवर आघात करण्यासाठी एक दलाल म्हणून काम करत आहे. सातारा धर्मादाय आयुक्तांनी त्यांच्या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की, या अंनिसवर प्रशासक नेमला पाहिजे. माझी भाजप सरकारला विनंती आहे की, त्यांनी या आदेशावर कार्यवाही करावी, असा घणाघात सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी पुणे येथे श्री. विक्रम भावे यांच्या ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात केला. या वेळी व्यासपिठावर भाजपचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते श्री. माधव भांडारी, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर, पुस्तकाचे लेखक श्री. विक्रम भावे हे उपस्थित होते.

पुरावे असतील, तर कारवाई करा ! – आमदार विजय वडेट्टीवार, काँग्रेस

अभय वर्तक किंवा भाजप यांना सांगायचे आहे की, एवढ्या ११ वर्षे तुमचीच सत्ता आहे. कुणी अडवले आहे तुम्हाला ? पुरावे असतील तर चौकशी करून कारवाई करा. या राष्ट्राच्या विरुद्ध जो काम करील, त्याला समर्थन देण्याचे काही कारण नाही.

संपादकीय भूमिका

अशी मागणी का करावी लागते ? पोलीस आणि प्रशासन यांना ते लक्षात येत नाही का ?