तळमळीने व्यष्टी आणि समष्टी साधना करणारे अन् साधकांना आधार देणारे फोंडा (गोवा) येथील श्री. मिलिंद बोकाडे (वय ५४ वर्षे) !

‘शांतीनगर, फोंडा, गोवा येथील श्री. मिलिंद बोकाडे यांची साधकांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्री. मिलिंद बोकाडे

१. श्री. सूर्यकांत सतरकर, पिरोळ, फोंडा.

अ. ‘श्री. मिलिंददादा शांतपणे आणि इतरांना समजेल, असे बोलतात. ते भ्रमणभाषवर बोलण्यापूर्वी नेहमी समोरच्या व्यक्तीला ‘तुम्ही व्यस्त नाही ना ?’, असे विचारतात.

आ. त्यांची निरीक्षणक्षमता चांगली आहे. त्यांना एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यावरून त्या व्यक्तीच्या मनाची स्थिती लक्षात येते.

इ. ते प्रत्येक प्रसंगात योग्य दृष्टीकोन सांगतात.’

२. सौ. श्वेता सुशांत नाईक, फातोर्डा, गोवा.

२ अ. व्यष्टी साधनेचा आढावा प्रांजळपणे देणे : ‘मिलिंददादा त्यांच्या साधनेचा आढावा पू. (श्रीमती) सुमन नाईक (सनातनच्या ६२ व्या (समष्टी) संत, वय ७६ वर्षे) यांना देतात. दादा नेहमी प्रांजळपणे आढावा देतात. ते आढावा सांगत असतांना मला त्यांच्याकडून पुष्कळ शिकायला मिळते.

२ आ. शिकण्याची वृत्ती : ते प्रत्येक साधकाकडून ‘काय शिकायला मिळाले ?’, याचे चिंतन करतात.

२ इ. रुग्णाईत आईची सेवा करणे : त्यांची आई रुग्णाईत आहे. ते आईची सेवा मनापासून करतात. ‘कुटुंबात राहून साधना कशी करायची ?’, हे आम्हाला दादांकडून शिकायला मिळते.

२ ई. गुरुदेवांप्रती भाव : ते प्रत्येक कृती करतांना प.पू. गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) शरण जातात.

२ उ. ते प्रत्येक प्रसंगात ‘सर्व काही ईश्वरेच्छेने होते’, असा भाव ठेवतात.’

३. श्री. राजेंद्र नाईक, बोरी, फोंडा, गोवा.

अ. ‘साधक व्यष्टी साधनेच्या आढाव्यात त्यांचे साधनेचे प्रयत्न सांगतात. तेव्हा मिलिंददादा साधकांना ‘आणखी प्रयत्न कसे वाढवू शकतो ?’, याचे चिंतन करून सांगतात.

आ. दादांमध्ये पुष्कळ प्रेमभाव आहे. ते शांतपणे बोलतात. त्यामुळे ‘त्यांचे बोलणे ऐकतच रहावे’, असे वाटते.’

४. सौ. रेवती प्रभुदेसाई, बोरी, फोंडा, गोवा.

अ. ‘दादा नेहमी इतरांचा विचार करतात.

आ. ते सेवा उत्तरदायी साधकांना विचारून करतात.

इ. ते सेवेतील सर्व बारकावे स्वत: जाणून घेतात आणि इतरांना सांगतात.

ई. त्यांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न नेहमी चांगले असतात.’

५. सौ. निलांगी देसाई, बोरी, फोंडा, गोवा.

अ. ‘दादा प्रत्येक गोष्ट नीटनेटकेपणाने करतात.

आ. ते प्रत्येक गोष्टीचे चिंतन करतात आणि ‘सेवेत चुका होणार नाहीत’, याकडे कटाक्षाने लक्ष देतात. ते सेवेची व्याप्ती काढतात आणि परिपूर्ण सेवा करतात.

इ. त्यांच्याकडून आईची सेवा करतांना काही चूक झाल्यास ते ती चूक आढाव्यात सांगतात आणि त्यासाठी प्रायश्चित्तही घेतात.

ई. ते दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आलेली साधनेची सूत्रे सर्व साधकांना पाठवतात. त्यामुळे आढावा घेणार्‍या साधकाला साहाय्य होते.’

६. सौ. शकुंतला जोशी (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ७४ वर्षे), शांतीनगर, फोंडा, गोवा.

६ अ. आईची सेवा साधना म्हणून आणि भावपूर्ण करणे : ‘त्यांची आई वयोमानामुळे पुष्कळ वर्षे रुग्णाईत आहे. त्यांच्या आईला शारीरिक आणि मानसिक त्रास आहेत. दादांना आईची सेवा २४ घंटे लक्ष देऊन करावी लागते. ते अनेक वर्षे ही सेवा न कंटाळता करत आहेत. याविषयी त्यांच्या मनात कधीच प्रतिक्रिया येत नाही. ‘आईची सेवा ही आपली साधनाच आहे’, अशा भावाने ते आईची सेवा करतात. त्यामुळे त्यांची साधनेत प्रगती निश्चितच होणार आहे.

६ आ. साधकांना आधार देणे

१. दादा साधकांना ‘चुकांमधून कसे शिकायचे आणि त्यातून पुढे कसे जायचे ?’, याविषयी सांगतात. त्यामुळे साधकांना साधनेत पुढे जाण्यास प्रेरणा मिळते.

२. त्यांना अवगत असलेली साधनेची सूत्रे ते साधकांना समजावून सांगतात. त्यामुळे साधकांना त्यांचा आधार वाटतो.

३. ते इतरांना साहाय्य करण्यास तत्पर असतात.

६ इ. समाजातील व्यक्तींशी जवळीक साधणे : ते समाजातील व्यक्तींशी लगेच जवळीक साधतात. ते विमा आस्थापनात नोकरी करत असतांना त्यांनी अनेक जिज्ञासूंना जोडून ठेवले आहे. दादांमध्ये गुरुदेवांप्रती उत्कट भाव असल्यामुळे दादांच्या संपर्कात आलेली प्रत्येक व्यक्ती कार्याशी जोडली जाते.

६ ई. दृढ श्रद्धा : ते ‘आईची सेवा करणे, पत्नीला घरकामात साहाय्य करणे आणि समष्टी सेवा करणे’, हे सर्व दृढ श्रद्धेच्या बळावर लीलया करू शकतात. त्यामुळे ‘दादांचे विशेष कौतुक करावे’, असे वाटते.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १०.१.२०२५)