काँग्रेसच्या काळात कबरीला संरक्षण मिळाल्याची माहिती

मुंबई – समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी ‘औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता’, असे विधान केले होते. त्यानंतर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘औरंगजेबाची कबर उखडून टाकावी’, असे म्हटले होते. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘आम्हालाही असेच वाटते. केवळ काही गोष्टी कायद्याने कराव्या लागतात; कारण ती कबर संरक्षित आहे. काँग्रेसच्या काळात त्या कबरीला ए.एस्.आय.चे (भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे) संरक्षण मिळालेले आहे.’’
संपादकीय भूमिकानागरिकांप्रमाणे शासनाच्याही जे मनात आहे, त्याची लवकरात लवकर पूर्तता करून छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पुन्हा एकदा घडवावा, ही अपेक्षा ! |