Assault Hindu Devotees : गुजरातमधील श्रीनाथजी मंदिरात फटाके फोडणार्‍या हिंदु कुटुंबावर मुसलमानांकडून आक्रमण !

आक्रमणात घायाळ झालेले विपुल ठक्कर

द्वारका (गुजरात) –  देवभूमी द्वारकामधील खांभालिया येथे श्रीनाथजी मंदिराच्या प्रांगणात फटाके फोडल्याविषयी ४ मुसलमानांनी एका हिंदु कुटुंबावर आक्रमण केले. मकसूद, तौसिफ, मोईन आणि फूलकंद, अशी आक्रमण करणार्‍यांची नावे आहेत. आक्रमणकर्त्यांनी रमजानचे कारण देत फटाके फोडण्यावर आक्षेप घेतला होता. यावरून वाद झाला आणि मुसलमान आरोपींनी हिंदु कुटुंबावर आक्रमण केले. यामध्ये एका अल्पवयीन मुलासह दोघे जण घायाळ झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम ११५(२), ११७(२), ३५२ च्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

१. पीडित हिंदु कुटुंबातील एक सदस्य श्रीनाथजी मंदिराच्या प्रांगणात फटाके फोडत होता. त्या वेळी मकसूद, मोईन, फूलकंद आणि तौसिफ हे काठ्या घेऊन मंदिरात घुसले. मुसलमान आरोपींनी हिंदु कुटुंबाला शिवीगाळ आणि मारहाण केली. शेजारच्या लोकांना येतांना पाहून आक्रमणकर्त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. या आक्रमणात हिंदु कुटुंबातील विपुल ठक्कर आणि त्याचा  पुतण्या घायाळ झाले.

२. विपुल ठक्कर यांनी असा आरोप केला की, आक्रमणकर्त्यांनी त्यांच्याशी केवळ गैरवर्तन केले नाही, तर मंदिर आणि हिंदूंच्या देवता यांचा अपमानही केला आहे. त्यांनी हिंदु कुटुंबाला ठार मारण्याची धमकीही दिली होती. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

हिंदूंकडून वर्षातून एखाद-दोन वेळा फोडण्यात येणार्‍या फटाक्यांचा आवाजही सहन न करणारे मुसलमान स्वतः दिवसातून ५ वेळा भोंग्यांवरून कर्णकर्कश आवाजात हिंदूंना अजान ऐकवतात, हे लक्षात घ्या !