Pope Francis Passes Away : पोप फ्रान्सिस यांचे निधन

पोप फ्रान्सिस

व्हॅटिकन सिटी – ख्रिस्त्यांचे सर्वाेच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे २१ एप्रिलला दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचे वय ८८ वर्षे होते. व्हॅटिकनजवळील कासा सांता मार्टा येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नुकत्याच झालेल्या ‘इस्टर संडे’च्या निमित्ताने ते बर्‍याच कालावधीनंतर लोकांसमोर आले होते. पोप यांच्यावर रुग्णालयात १ महिना उपचार करण्यात आल्यानंतर २४ मार्चला त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते.