BSF Clash With Bangladeshi Smugglers : भारत-बांगलादेश सीमेवर बांगलादेशी तस्करांकडून भारतीय सैनिकांवर गोळीबार

  • ३ सैनिक घायाळ

  • भारताच्या प्रत्युत्तरात १ तस्कर ठार

सिपाहिजला (त्रिपुरा) – सिपाहिजला जिल्ह्यात अनुमाने २० ते २५ बांगलादेशी तस्करांनी भारतीय सीमेत घुसखोरी केल्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या गस्ती पथकाने त्यांना अडवले. त्या वेळी तस्करांनी सैनिकांवर आक्रमण केले. यात ३ सैनिक घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

जेव्हा तस्करांनी सैनिकांकडून बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा एका सैनिकाने स्वसंरक्षणार्थ गोळी झाडली. यामध्ये महंमद आलमीन नावाचा बांगलादेशी तस्कर घायाळ झाला. त्याला रुग्णालात भरती करण्यात आल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. ‘परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गोळीबार  करावा लागला’, असे सीमा सुरक्षा दलाने म्हटले आहे. हे तस्कर कोण होते ? आणि त्यांचे जाळे किती दूरपर्यंत पसरले आहे ?, यांचे अन्वेषण पोलीस करत आहेत.

संपादकीय भूमिका

अशा घटना जाणीवपूर्वक घडवल्या जात आहेत का ?, याचाही शोध घेतला पाहिजे !