बार्देशमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्याने पकडलेले पोर्तुगीजांचे प्रजाजन शेकडो स्त्री-पुरुष, मुले यांच्या मोबदल्यात महाराजांनी एक रुपयाही न घेता त्यांना पाद्री गोसाल यांच्या हवाली केले. या संदर्भात पुढे ‘युद्धात कैद केलेल्या स्त्रियांना छत्रपती शिवाजी महाराजांकडून सन्मानाची वागणूक मिळते’, असा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांविषयी पोर्तुगीज चरित्रकार ‘कोस्मी- द- ग्वार्द’ करतो.

‘बायलांक उखलून व्हेली’ (बायकांना उचलून नेले), असे म्हणणार्या अधिवक्ता उदय भेंब्रे यांना ‘उचलून नेणे’ आणि ‘कैद करणे’ यांत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चारित्र्यावर होणारा आघात कळत नाही का ? निश्चितच कळतो. अभिव्यक्तीस्वातंत्र्य असूनही भेंब्रे कधीच ‘माल-ए-गनिमत’वर (जप्त केलेल्या मालाविषयी) व्यक्त होणार नाहीत.
६ डिसेंबर १६६७ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी पोर्तुगीज गव्हर्नर विजरई कोंदी यास पत्र पाठवले, ते पत्र उपलब्ध आहे. त्यातून पोर्तुगीजांच्या या कागाळ्या उघडकीस येतात. पोर्तुगीजांनी १९ नोव्हेंबर १६६७ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलुखातील कोळी लोक, लहान मुले, महिला, पुरुष यांना धरून लुटून घेऊन गेले. ते बळजोरीने धर्मांतर करू लागले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुलुखात उपद्रव करणार्यांना, म्हणजे लखम सावंत, केशव नाईक देसाई यांना पोर्तुगीजांनी आश्रय दिला होता. मग छत्रपती शिवाजी महाराज यांनी पत्र पाठवूनही पोर्तुगीज ऐकत नाहीत; म्हणून त्यांच्यावर स्वारी करून त्यांना झटका दाखवला. यानंतर मग ‘पोर्तुगीजांच्या भीतीपोटी छत्रपती शिवाजी महाराजांशी तहासाठी सिद्ध झाले. शिवाजी महाराज हरले’, असे जे भेंब्रे म्हणतात, त्या तहाच्या अटी पाहिल्यास तसे दिसत नाही. मग हे सगळे केवळ सावंत आणि पर्यायाने भाजप कसे चुकीचे आहे, धार्मिक ध्रुवीकरण करू पहाते, यासाठी होते का ? एक ‘नॅरेटिव्ह’ (खोटे कथानक) किंवा सांगण्याची पद्धत वा शैली पहाता असे लक्षात येते की, या सर्वांना पुढील काही गोष्टी रुजवायच्या आहेत.
१. गोवा हा भौगोलिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या वेगळाच होता, तो उर्वरित भारताशी जोडलेला नव्हता.
२. पोर्तुगीज हे गोव्याचे राज्यकर्ते होते आणि त्यांच्यावर मराठ्यांनी बाहेरून येऊन आक्रमण केले.
३. ख्रिस्तीकरण (त्याला धर्मांतर का म्हटले जाते ?) पोर्तुगीजांनी केले. चर्च, मिशनरी यांचा त्यात काही हात नव्हता.
– श्री. प्रसन्न शिवराम बर्वे, पणजी, गोवा. (२.३.२०२५)
संपादकीय भूमिका‘नॅरेटिव्ह’ (खोटे कथानक) सांगण्याची पद्धत वा शैली पहाता त्यातून पुढे काही गोष्टी रुजवून समाजात फूट पाडायची आहे, हेच लक्षात येते ! |