धर्मांतर, गोहत्या, मंदिर सरकारीकरण अशा समस्यांवर हिंदु राष्ट्राची स्थापना हेच उत्तर ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

भुये (जिल्हा कोल्हापूर) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी ६५० हून अधिक जिज्ञासूंची उपस्थिती

सभेत मार्गदर्शन करतांना सद्गुरु स्वाती खाडये

भुये (जिल्हा कोल्हापूर), २८ फेब्रुवारी (वार्ता.) – भारत हिंदूबहुल देश असूनही अनेक ठिकाणी सरकारीकरण झालेल्या देवस्थानांच्या मालकीच्या भूमी परस्पर विकल्या गेल्याचे आहेत. काही देवस्थानांमध्ये भक्तांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. एके काळी गोपालकांची भूमी असलेल्या भारतात प्रतिदिन गोमातांच्या हत्या होत आहेत. धर्मांतरामुळे मिझोरामसारख्या राज्यात हिंदू अल्पसंख्य होत आहेत. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोगल आक्रमकांच्या विरोधात लढून हिंदवी स्वराज्य स्थापन केले, त्याप्रमाणे हिंदूंनाही िवविध समस्यांच्या उत्तरासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करावी लागेल, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले. त्या भुये (करवीर तालुका) येथे हिंदु जनजागती समितीच्या वतीने आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होत्या. सभेसाठी ६५० हून अधिक जिज्ञासू उपस्थित होते.

भुये (जिल्हा कोल्हापूर) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत उपस्थित जिज्ञासू

सभेत हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री माणिक स्वामी, भानुदास पाटील, अजित साळुंखे, अमर मिसळ, प्रल्हाद पाटील यांचा हिंदुत्वाच्या कार्यातील विशेष सहभागासाठी सत्कार करण्यात आला. सभेचे आयोजन गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन केले