Zelensky Announces Resignation : युक्रेनमध्ये शांततेसाठी राष्ट्राध्यक्षपद सोडण्यास सिद्ध !

कीव – रशिया-युक्रेन युद्धाला ३ वर्षे पूर्ण झाली आहेत. यावेळी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, शांततेसाठी ते काहीही करण्यास सिद्ध आहेत. राष्ट्राध्यक्षपदाचे राजीनामा दिल्याने शांतता येईल किंवा युक्रेनला नाटो (‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ नावाची जगातील २९ देशांचा सहभाग असलेली एक सैनिकी संघटना) सदस्यत्व मिळेल, तर ते त्यागपत्र देण्यास सिद्ध आहेत.

झेलेन्स्की यांनी कीवमधील पत्रकार परिषदेत सांगितले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे कायमचे त्या पदावर राहाणार नाहीत; पण रशियाचा धोका नेहमीच राहील. ट्रम्प आणि पुतिन गेल्यानंतरही आपल्याला कायमस्वरूपी शांतता हवी आहे.

युद्धाला ३ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रशियाने २६७ ड्रोनने केले आक्रमण !

युक्रेन युद्धाला ३ वर्षे पूर्ण होण्याच्या एक दिवस आधी रशियाने युक्रेनवर ड्रोनद्वारे आक्रमण केले. रशियाने एकाच वेळी इतके ड्रोन उडवण्याची ही पहिलीच वेळ आहे. युक्रेनच्या अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार खार्किव्ह, पोल्टावा, सुमी आणि कीव यांसह किमान १३ शहरांमध्ये ड्रोन आक्रमणे करण्यात आली.