Baramulla 2 Terrorists Killed : बारामुला येथे घुसखोरी करणारे २ आतंकवादी ठार

कुलगाम येथे चकमक चालू !

कुलगाम (जम्मू-काश्मीर) – बारामुलाच्या उरी सेक्टरमध्ये नियंत्रणरेषेजवळ आतंकवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. त्या वेळी सैन्याने केलेल्या गोळीबारात २ आतंकवाद्यांना ठार केले. सैन्याधिकार्‍यांनी सांगितले की, सुरक्षादलांना २-३ आतंकवादी घुसखोरीचा प्रयत्न करतांना दिसले होते.

कुलगाम येथे जिहादी आतंकवादी आणि सुरक्षादल यांच्यात चकमक चालू आहे. येथे सुरक्षादलांनी तंगमार्ग परिसरात आतंकवाद्यांना घेरले आहे.