अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांचे विधान

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारतात ‘टेस्ला’चा प्रकल्प उभारणे अमेरिकेसाठी चुकीचे होईल, असे मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे. ‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. विशेष म्हणजे या वेळी टेस्लाचे मालक असणारे अमेरिकी उद्योगपती इलॉन मस्क हे उपस्थित होते. टेस्लाने भारतात नोकरभरती चालू केली आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे विधान चर्चेचा विषय ठरू लागले आहे.
ट्रम्प म्हणाले की, जगातील प्रत्येक देश आमचा लाभ घेण्याचा प्रयत्न करतो. ते आमच्या देशातील आस्थापनांच्या उत्पादनांवर शुल्क आकारतात. त्यामुळे या आस्थापनांना व्यापार करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. इलॉन मस्क भारतात प्रकल्प थाटणार असतील, तर त्यांच्यासाठी हे ठीक असेल; पण अमेरिकेसाठी हे योग्य होणार नाही. अमेरिकेसाठी ते खूप चुकीचे ठरेल.