पिंपरी (पुणे) येथील कुदळवाडी-चिखली अतिक्रमण काढण्‍यासाठी आग्रही होतो ! – महेश लांडगे, आमदार, भाजप

४ सहस्र १११ अतिक्रमणांवर कारवाई, ८२७ एकर क्षेत्रावरील अतिक्रमणे निष्‍कासित

श्री. महेश लांडगे

पिंपरी (पुणे) – महानगरपालिका प्रशासनाने कुदळवाडी-चिखली भागात भारतातील सर्वांत मोठी अतिक्रमण कारवाई केली. या कारवाईसाठी आम्‍ही पहिल्‍यांदा स्‍पष्‍ट भूमिका मांडली होती. ‘प्रशासनाने अनधिकृत भंगार व्‍यावसायिक, अवैध धंदे आणि इंद्रायणी नदी प्रदूषणाला कारणीभूत ठरणार्‍या या व्‍यावसायिकांवर कारवाई करावी’, अशी भूमिका आम्‍ही सातत्‍याने मांडत आलो आहोत’, असे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

महापालिका प्रशासनाने ८ ते १७ फेब्रुवारीपर्यंत एकूण ४ सहस्र १११ अतिक्रमणांवर कारवाई केली. यामध्‍ये एकूण ३ कोटी ६० लाख ५८ सहस्र ७४६ चौरस फूट क्षेत्रावरील म्‍हणजे अनुमाने ८२७ एकर क्षेत्रावरील अतिक्रमणे निष्‍कासित (काढून टाकणे) केली आहेत. या कारवाईतून महापालिकेचे रस्‍ता आणि आरक्षण यांसाठीचे एकूण १०० एकर क्षेत्र अतिक्रमणमुक्‍त झाले आहे.

आमदार महेश लांडगे पुढे म्‍हणाले की, या अतिक्रमण कारवाईदरम्‍यान कायदा आणि सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न किंवा धार्मिक तेढ निर्माण होईल. या कारणास्‍तव ‘समाजमाध्‍यम’ किंवा जाहीरपणे भूमिका व्‍यक्‍त करू नये, असे प्रशासनाच्‍या बैठकीत ठरले होते. त्‍यामुळे आता स्‍पष्‍ट भूमिका मांडत आहे.