पुणे येथे गोरक्षकावर कसायांकडून प्राणघातक आक्रमण !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पुणे – केडगाव दापोडी पथकरनाका या ठिकाणी नुकतेच महिंद्रा बोलेरो या चारचाकी गाडीमधून गोवंश आणि वासरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्‍याची माहिती मानद प्राणी कल्‍याण अधिकारी अहिरेश्‍वर जगताप यांना मिळाली. त्‍यांनी हे वाहन थांबवण्‍याचा प्रयत्न केला असता गोरक्षक अहिरेश्‍वर जगताप आणि त्‍यांचे बंधू मयुरेश्‍वर जगताप, तसेच संकल्‍प पाटोळे आणि विकास शेंडगे यांच्‍यावर कलानगर येथे कसायी आणि त्यांचे दलाल यांनी घेराव घालून प्राणघातक आक्रमण करत, त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. (राज्‍यात गोवंश हत्‍याबंदी कायदा लागू असतांना मोठ्या प्रमाणात अवैधरित्‍या गोवंशियांची हत्‍या, वाहतूक केली जात आहे. गोरक्षकांवर जीवघेणी आक्रमणे होत आहेत ! यावरून गोतस्‍करीच्‍या समस्‍येची भीषणता किती आहे ? याची कल्‍पना येते. गोवंशहत्‍या प्रतिबंध कायदा करून अनेक वर्षे झाली आहेत, तरी सरकार गोहत्‍या, गोतस्‍करी आणि अवैध पशूवधगृहे यांना प्रतिबंध कधी करणार आहे ? – संपादक) कसायांचा जमाव मोठ्या प्रमाणात असल्‍याने गोरक्षकांनी जमावातून निसटून केडगाव पोलीस चौकी येथे जाऊन कसायांच्‍या विरोधात तक्रार प्रविष्‍ट केली आहे. या प्रकरणी गोरक्षक मयुरेश्‍वर जगताप यांनी सचिन मेमाणे, योगेश शिंदे, बिल्‍डर कुरेशी आणि एक अज्ञात अशा ४ कसायांच्‍या विरोधात तक्रार  केली आहे.

संपादकीय भूमिका :

अजून किती गोरक्षकांच्‍या जिवावर बेतल्‍यावर पोलीस प्रशासन कसायांचा कायमचा बंदोबस्‍त करणार ?