
१. संपर्काला आरंभ करण्यापूर्वी प्रार्थना केल्याने समाजातून सकारात्मक प्रतिसाद मिळणे
‘साधकांनी संपर्काच्या सेवेला आरंभ करण्यापूर्वी तेथील स्थानदेवता, वास्तुदेवता आणि गुरुदेव यांना प्रार्थना करावी. प्रार्थना करून सेवेला आरंभ केल्याने सेवेतून अधिक आनंद मिळतो आणि समाजातून सकारात्मक प्रतिसादसुद्धा मिळतो.
२. विज्ञापनदात्यांच्या संपर्कात राहिल्याने जवळीक वाढून त्यांनी साधनेला आरंभ करणे, तसेच त्यांच्या कार्यालयातील कर्मचारीही हळूहळू नामजप करू लागणे
साधकांनी विज्ञापनदात्यांच्या संपर्कात राहिल्यास त्यांच्याशी जवळीक वाढते आणि ते साधना करायला आरंभ करतात. विज्ञापनदात्यांशी आपले बोलणे-वागणे हे नम्र आणि आदरार्थी असायला पाहिजे. विज्ञापनदात्यांच्या कार्यालयातील इतर कर्मचार्यांशी अनौपचारिक बोलून त्यांनाही आपण साधना सांगू शकतो. असे काही कार्यालयांमध्ये मला अनुभवायला मिळाले. मी तिथे गेल्यावर त्यांना आनंद होतो. ते म्हणतात, ‘‘तुम्ही आल्यावर आम्हाला छान वाटते.’’ तेथील कर्मचारी आता नामजपही करतात. ते सनातनचे सात्त्विक उत्पादन साहित्य घेतात. काहींनी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ किंवा पाक्षिक ‘सनातन प्रभात’ चालू केले आहे. त्यांना संकेतस्थळाविषयी सांगितल्यावर काही जण संकेतस्थळ पहातात, तसेच त्यांच्या जवळच्या लोकांनाही त्याविषयी सांगतात.
३. काही कार्यालयांमध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी वाचनालये असतात. ते कार्यालयातील वाचनालयात त्यांच्यासाठी ग्रंथ ठेवू शकतात. त्यासाठी त्यांच्याकडे वेगळा निधी असतो.
४. साडीच्या दुकानदाराला नामजपाचे महत्त्व सांगितल्यावर त्यांनी त्यांच्या दुकानात आलेल्यांनाही माहिती सांगायला सांगणे
आंध्रप्रदेशात एका साडीच्या दुकानात आम्ही संपर्कासाठी गेलो असतांना त्यांना ‘श्री गुरुदेव दत्त ।’ आणि कुलदेवता यांच्या नामजपाचे महत्त्व सांगितले. त्यांना ‘सनातन संस्थे’ची माहितीही दिली. तेव्हा त्यांनी ‘सनातन पंचांगा’च्या तळपट्टीचे विज्ञापन दिले. त्यांच्या दुकानात तेथील अन्य व्यावसायिक, त्यांची पत्नी आणि नातेवाईक आले होते. तेव्हा त्या द़ुकानदारांनी त्या सर्वांना नामजपाचे महत्त्व सांगायला सांगितले. तेव्हा त्यांनी पंचांगाची मागणी केली. मी त्यांना सनातननिर्मित श्री दत्तगुरूंचेे चित्रही भेट म्हणून दिले. त्यांनी नातेवाईक आणि त्यांचे मित्र यांच्यासाठी श्री दत्तगुरूंची आणखी चित्रे मागून घेतली.
५. चामड्याची पादत्राणे बनवणार्या मोठ्या आस्थापनात गेल्यावर त्यांनी ग्रंथसंच आणि ‘सनातन कापूर’ यांची मोठी मागणी करणे, तेव्हा ‘देव देण्यासाठी बसला आहे; पण आपण ते घ्यायला न्यून पडतो’, याची अनुभूती येणे
आग्रा येथे चामड्याची (लेदरची) पादत्राणे बनवणार्या एका मोठ्या आस्थापनात (कंपनीत) संपर्क केला असता त्यांनी शाळांसाठी ५० ग्रंथसंच घेतले. त्या वेळी मी त्यांना ‘तुमच्या कर्मचार्यांसाठीसुद्धा हे ग्रंथ ठेवू शकता’, असे सांगितल्यावर त्यांनी त्यांच्या व्यवस्थापकांना (‘मॅनेजर’ना) बोलावून एक खोली रिकामी करून तिथे एक कपाट ठेवायला सांगितले. कार्यालयातील कर्मचारी आणि अन्य कर्मचारी यांच्यासाठी त्यांनी ग्रंथसंच घेतले. आमची चर्चा चालू असतांना तिथे त्यांचे मित्र आले. त्यांनाही शाळेसाठी ग्रंथसंच आवडले आणि एकाने २० अन् दुसर्याने १० संचांची मागणी केली. सनातनची सात्त्विक उत्पादने दाखवल्यावर त्यांना ‘सनातन कापूर’ आवडला. ‘त्याचा वापर कसा करायचा ?’, हे सांगितल्यावर त्यांनी त्यांच्या कर्मचार्यांसाठी ५ किलो कापराची मागणी केली.
त्या वेळी ‘आपण समाजात संपर्क करायलाच न्यून पडतो’, याची मला जाणीव झाली. ‘देव द्यायला बसला आहे; पण आपण ते घ्यायला न्यून पडत आहोत’, याची अनुभूती गुरुदेवांनी दिली. यासाठी गुरुदेवांप्रती माझी कृतज्ञता व्यक्त झाली.
६. विज्ञापने मिळवणे आणि सनातनची सात्त्विक उत्पादने सर्वत्र पोचवणे, यांसाठी साधकांनी तळमळीने प्रयत्न करून गुरुकृपा अनुभवावी !
सनातनची सर्व उत्पादने, उदा. ग्रंथ, वह्या, पंचांग आदींमध्ये ईश्वराचे पुष्कळ चैतन्य आहे, तसेच सच्चिद़ानंद परब्रह्म गुरुदेवांचा संकल्पही आहे. आपण केवळ गुरुदेवांनी दिलेल्या संधीचा लाभ करून घ्यायला हवा. आपण सकारात्मक राहून दैनिक, साप्ताहिक आणि पाक्षिक ‘सनातन प्रभात’, तसेच ‘सनातन पंचांग’ यांसाठी विज्ञापने घेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्याचप्रमाणे सनातनच्या उत्पादन-साहित्यांमधून समाजात सात्त्विकता आणि चैतन्य कसे पोचेल ?’, यासाठी प्रयत्न करायला हवेत. सद्यस्थितीत समाजातून आपल्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपण साधकांनी त्याचा लाभ करून घेऊन गुरुकृपा अनुभवूया !’
– श्रीमती स्मिता नवलकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ७३ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२३.१२.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |