
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान मोदी यांची एकत्र पत्रकार परिषद ‘व्हाईट हाऊस’मध्ये चालू होती. त्या वेळी ट्रम्प यांना खलिस्तानविषयी प्रश्न विचारला गेला. ‘२६ नोव्हेंबर २००८ च्या आक्रमणातील आतंकवादी तहव्वुर राणा याला ट्रम्प भारताच्या कह्यात देणार आहेत. ‘खलिस्तानी आतंकवाद्यांना भारताकडे हस्तांतरित करणार का ?’, असा प्रश्न ट्रम्प यांना विचारला गेला. त्याचे निसंदिग्ध उत्तर ‘होय’, असे ट्रम्प यांनी दिले. बायडेन प्रशासनाला चार शब्द सुनावून खलिस्तानच्या बंदोबस्तासाठी अमेरिका भारताशी सहकार्य करील, असेही आश्वासन ट्रम्प यांनी दिले.
खलिस्तान ही मुख्यतः घाबरट आणि पळपुटे लोकांनी भारताबाहेरून चालवलेली चळवळ आहे. भारतातील शीख समाजातून खालिस्तानला फारसा पाठिंबा नाही. कॅनडा आणि अमेरिका येथे लपून राहिलेले पन्नूसारखे आतंकवादी खलिस्तानचा ‘प्रपोगांडा’ (अपप्रचार) चालवतात. अमेरिका-कॅनडामधील उदारमतवादी सरकारांच्या आशीर्वादाने इतके दिवस खलिस्तानचा खेळ चालू होता. आता ट्रम्प आणि मोदी यांनी डोळे वटारताच खलिस्तानी पिवळे झेंडे गायब होणार आहेत; कारण घाबरटांचे धागेदोरे आधीच पिवळे पडले आहेत. मोदींच्या परराष्ट्र धोरणाचे हे महत्त्वाचे यश आहे. अमेरिका वारी यशस्वी झालेली आहे.
– डॉ. अभिराम दीक्षित, पेनिस्लिव्हेनिया, अमेरिका. (१५.२.२०२५)