१. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ केवळ वर्तमानपत्र नसून ते गुरुदेवांचे संदेशपत्र आहे’, या भावाने साधकांनी सेवा करणे
‘दैनिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करणार्या साधकांचा ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ हे केवळ वर्तमानपत्र नसून ते गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) संदेशपत्र आहे’, असा भाव आहे. दैनिकाचे वार्ताहर, संपादक, रचनाकार, वितरक आणि वाचक यांचाही असाच भाव असतो.त्यामुळे प्रत्येक सेवा परिपूर्ण आणि भावपूर्ण करण्याचा प्रयत्न असतो.

२. दैनिक विभागातील वातावरण आनंदी आणि उत्साही असणे
‘दैनिक विभागातील सर्व साधक मिळून मिसळून रहातात. त्यामुळे विभागातील वातावरण आनंदी, उत्साही आणि मोकळेपणाचे असते. ‘सर्वच साधक शिकण्याच्या स्थितीत आणि आनंदी असतात’, असे मला वाटते.
३. साधकांना चुका सांगून साहाय्य करणे
एखाद्या साधकाची चूक लक्षात आल्यास त्याला त्याविषयी तत्परतेने सांगून साधनेत साहाय्य केले जाते. त्या साधकाला चुकीच्या गांभीर्यानुसार जाणीव करून दिली जाते, जेणेकरून त्याच्याकडून ती चूक पुन्हा होणार नाही.
४. साधकांना एकमेकांचा आधार वाटणे
साधक उत्तरदायी साधकांशी मनमोकळेपणाने बोलतात. ‘उत्तरदायी साधकांकडून अडचण सुटेल’, याची निश्चिती असते. त्यामुळे विभागातील प्रत्येकालाच एकमेकांचा आधार वाटतो.
५. संघभावना
रचनाकार असो किंवा संपादक असो, ‘दैनिकाची सेवा परिपूर्ण, भावपूर्ण आणि समयमर्यादेत होणे, हे आपले दायित्व आहे’, याची सर्वांना जाणीव असते. त्यामुळे सर्व जण संघटितपणे सेवा करतात.
६. दैनिक ‘सनातन प्रभात’ म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी गुरुदेवांनी प्रज्वलित केलेली ज्योत असणे आणि ‘कृतीशीलता’ हाच दैनिक ‘सनातन प्रभात’चा मापदंड असणे
दैनिक ‘सनातन प्रभात’ म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी गुरुदेवांनी प्रज्वलित केलेली ज्योत आहे. केवळ ‘वाचक संख्या जमवणे’ हा ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचा उद्देश कधीच नव्हता. ‘कृतीशीलता’ हा ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचा मापदंड आहे. आपल्या सर्वांना राष्ट्र आणि धर्महितैषी विचारांचा प्रचार करायचा आहे. ‘ज्योत से ज्योत जगाते चलो’, याप्रमाणे आपल्याला हिंदु राष्ट्राच्या या ज्योतीचे मशालीत रूपांतर करायचे आहे. हे कार्य करण्यासाठी देवच शक्ती देईल, हे निश्चित !
७. सूर्य उगवल्यावर दिवसाचा आरंभ उत्साहाने होतो. त्याप्रमाणेच साधक प्रतिदिन दैनिक विभागात उत्साहाने सेवा करण्यासाठी येतात.
‘अशा दैनिक विभागात गुरुदेवांच्या कृपेने मला सेवा करण्याची संधी लाभली’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. प्रज्ञा पुष्कराज जोशी, सनातन संकुल, देवद, पनवेल. (१४.२.२०२४)