१. आध्यात्मिक ज्ञान देणारे आणि जनजागृती करणारे एकमेव दैनिक ‘सनातन प्रभात’ !
– श्री. संजय कुलकर्णी, वरळी, मुंबई
२. ‘लव्ह जिहादच्या षड्यंत्राविषयी वस्तुनिष्ठ माहिती ‘सनातन प्रभात’मधून मिळते.
– श्रीमती आशा कवळी, वरळी, मुंबई
३. हिंदु धर्माविषयी अन्य वृत्तपत्रांतून माहिती मिळत नाही. ‘सनातन प्रभात’च ती माहिती देते.
– डॉ. शेखर वझे, गिरगाव, मुंबई
४. ‘सनातन प्रभात’ योद्ध्याप्रमाणे कार्यरत !
दैनिक ‘सनातन प्रभात’ हे वृत्तपत्र हिंदु धर्माचे अस्तित्व कायम रहाण्यासाठी, हिंदु धर्माचा प्रसार घरोघरी होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. प्रामाणिक आणि सद्यस्थितीचे अवलोकन करून परखडपणे लिखाण करणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ समाजात पोचणे अत्यावश्यक आहे. ‘सनातन प्रभात’चे कार्य पहाता हे वृत्तपत्र ‘हिंदूंच्या रक्षणासाठी’ आणि ‘हिंदु राष्ट्र’ निर्मितीसाठी असलेला योद्धाच आहे.
– श्री. विजय कोल्हापुरे, पनवेल
५. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अग्रेसर एकमेव दैनिक ‘सनातन प्रभात’ ! – अनिल सावंत, मुलुंड, मुंबई
सज्जनांच्या मनातील हिंदु राष्ट्र, रामराज्य सुरळीत न्यायिक समाजव्यवस्था निर्मितीसाठी प्रबोधन करण्यात अग्रेसर असणारे एकमेव दैनिक म्हणजे ‘सनातन प्रभात’. बातमीसह संपादकीय टीपणी, बातमीचा पाठपुरावा हे या वृत्तपत्राचा वेगळेपणा दर्शवते. देशाच्या विविध भागातील संत, महात्मे यांना शोधून त्यांचे आध्यात्मिक विचार वाचकांपर्यंत पोहचवण्याचे अलौकिक कार्य ‘सनातन प्रभात’ करत आहे. भविष्यातील आपत्कालाची जाणीव करून देऊन समाजाला राष्ट्र आणि धर्म जागृतीच्या कार्यात सहभागी होण्यासाठी ‘सनातन प्रभात’ प्रेरीत करत आहे. साधकांचे साधनेतील अनुभव, अनुभूती देऊन वाचकांच्या मनावर सेवा आणि साधना यांचे महत्त्व ‘सनातन प्रभात’ बिंबवत आहे. सनातन म्हणजे ‘शाश्वत विचार’ देणार्या दैनिक ‘सनातन प्रभात’ला वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
६. दीपस्तंभाप्रमाणे धर्मप्रकाशपुंज असणारे दैनिक म्हणजे ‘सनातन प्रभात’ होय ! – श्री. विठ्ठल मुगळखोड, साहाय्यक महाप्रबंधक (निवृत्त), नाबार्ड, मुंबई
मी गेल्या ८ वर्षांपासून ‘सनातन प्रभात’चा वाचक आहे. धर्म, संस्कृती आणि राष्ट्र रक्षणार्थ साधकांनी झळ सोसून चालवलेले दैनिक आहे. एकप्रकारे तो अहिर्नश यज्ञच आहे. संपादकीय लेख दैनिकाचे हृदय आहे. ‘सनातन प्रभात’ माझ्यासाठी गुरुस्थानी आहे. त्याच्यामुळे घरातील वातावरण सात्त्विक झाले. असा हा दीपस्तंभाप्रमाणे धर्मप्रकाशपुंज वाटणारे ‘सनातन प्रभात’ चिरायू राहील !