मुंबई – गेल्या ४ वर्षांपासून हिंदु जनजागृती समिती, तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांसारख्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी अनेक मोर्चे काढले. यात लक्षावधी हिंदू सहभागी झाले होते. या मोर्च्यांनंतर सरकारच्या लक्षात आले की, कायद्याची अनिवार्यता किती आहे ! आता शासनाने पुढचे पाऊल उचलले आहे. शासनाच्या या निर्णयाचे स्वागतच आहे.
देशात ८ राज्यांमध्ये हा कायदा अस्तित्वात आहे. महाराष्ट्रात कायदा येईल, त्याच्या दुसर्या दिवशीच लव्ह जिहादींवर गुन्हे नोंद व्हायला हवेत, तसेच सर्वांवर तात्काळ कारवाई व्हायला हवी. केवळ कायदा करून चालणार नाही, तर त्याची कठोर कार्यवाही व्हायला हवी. ही कार्यवाही किमान ५ वर्षे झाली, तर लव्ह जिहादी हिंदु तरुणींकडे वाकड्या नजरेने पहाण्याची हिंमत करणार नाहीत, अशी प्रतिक्रिया हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी व्यक्त केली आहे.