1984 Anti-Sikh Riots Case : वर्ष १९८४ च्या शीखविरोधी दंगलीच्या प्रकरणात काँग्रेस नेते सज्जन कुमार दोषी

१८ फेब्रुवारी या दिवशी शिक्षा सुनावली जाणार

काँग्रेस नेते सज्जन कुमार

नवी देहली – येथील राऊस अव्हेन्यू न्यायालयाने वर्ष १९८४ च्या शीख विरोधी दंगलीच्या प्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना दोषी ठरवले आहे. त्यांना १८ फेब्रुवारी या दिवशी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या दंगलीच्या वेळी सरस्वती विहारमध्ये २ शिखांच्या हत्येचा त्यांच्यावर आरोप होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ही दंगल उसळली होती.

१ नोव्हेंबर १९८४ या दिवशी पश्‍चिम देहलीतील राज नगर पार्ट-१ मध्ये सरदार जसवंत सिंह आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंह यांची हत्या करण्यात आली होती. दंगलीच्या जमावाचे नेतृत्व सज्जन कुमार करत होते.

संपादकीय भूमिका

४१ वर्षांनंतर आरोपींना दोषी ठरवण्यात येणे हा न्याय नव्हे, तर घोर अन्यायच होय !