UP Hindus Conversion : लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील वसाहतीत हिंदूंचे ख्रिस्ती पंथात धर्मांतर करण्याचा प्रयत्न

जागृत हिंदूंनी विरोध करत कारवाई करण्याची केली मागणी

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील गोमतीनगर एक्सटेंशन भागातील भरवारा स्टेट कॉलनीतील स्थानिक रहिवाशांनी एका व्यक्तीवर हिंदूंचे ख्रिस्ती पंथात धर्मांतर करण्याचा आरोप केला आहे. राजीव लाल असे त्याचे नाव असून त्याने त्याच्या घराचेच चर्चमध्ये रूपांतर केले आहे. (बाटगे हिंदू हे पोपपेक्षा कडवे असतात, याचे उदाहरण. असे बाटगे धर्मांतर केल्यावर त्यांचे नाव पालटत नाहीत; कारण हिंदु नाव तसेच ठेवून त्यांना अन्य हिंदूंचे धर्मांतर करणे सोपे जाते ! – संपादक) येथे प्रत्येक रविवारी दुपारी १ ते ३ या काळात १५० ते २०० लोकांना प्रार्थनेसाठी बोलावतात. या वेळी धर्मांतरही केले जाते.

१. राजीव लाल याच्या घराशेजारी रहाणारे रितेश मिश्रा यांनी सांगितले की, राजीव लाल लोकांना घरे आणि सदनिका यांचे आमिष दाखवून धर्मांतर करतो.

२. परिसरातील इतर लोकांचा आरोप आहे की, राजीवच्या घरी येणारे लोक त्यांच्या परिसरात एका विशिष्ट (ख्रिस्ती) समुदायाच्या लोकांना स्थायिक करत आहेत. हे लोक दुप्पट किमतीत रिकामी भूमी खरेदी करतात. यानंतर धर्मांतर करणार्‍या लोकांसाठी घरे बांधली जातात आणि दिली जातात.

३. भरवारा स्टेट कॉलनीतील रहिवाशांच्या मते, राजीव लाल याने ५-६ वर्षांपूर्वी त्याचे घर बांधले होते आणि त्यानंतर ६ महिन्यांनी हे सर्व घडू लागले. येथे धर्मांतर करणार्‍यांना घर किंवा सदनिका मिळते आणि धर्मांतर करण्यास नकार देणार्‍यांना त्यांचे घर विकून निघून जाण्यास सांगितले जाते.

४. स्थानिक लोकांनी आवाज उठवल्यानंतर पोलीसही घटनास्थळी पोचले. त्यांनी घरात प्रवेश केला आणि अनेक मुलींसह ५० हून अधिक लोकांना धर्मांतरित होण्यापासून वाचवले.

५. हिंदूंनी सांगितले की, जर योग्य कारवाई केली गेली नाही, तर ते त्यांच्या पद्धतीने चर्च हटवतील आणि प्रत्येक रविवारी चर्चबाहेर रामायणातील सुंदरकांडचे पठण करतील.

६. हिंदूंची मागणी आहे की, गेल्या ४-५ वर्षांपासून त्यांच्या परिसरात चालू असलेल्या अशा बेकायदेशीर कारवाया थांबवाव्यात.

संपादकीय भूमिका 

उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !