सिंधुदुर्ग सरपंच सेवा संघटनेचे अध्यक्ष प्रवीण गवस यांची चेतावणी
दोडामार्ग – ९ फेब्रुवारीपर्यंत दोडामार्गमध्ये ‘हत्ती पकडा’ मोहीम न राबवल्यास १० फेब्रुवारीला दोडामार्ग वन विभागाच्या कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण आणि त्यानंतर पुढे ‘हत्ती पकडा’ मोहीम चालू होईपर्यंत हत्तींचा उपद्रव होणार्या गावांतील शेतकरी साखळी उपोषण चालू करतील, अशी चेतावणी सिंधुदुर्ग सरपंच सेवा संघटनेचे अध्यक्ष प्रवीण गवस यांनी प्रशासनाला दिली आहे.
दोडामार्ग तालुक्यात एकूण ६ हत्तींचा वावर आहे. यात ५ हत्तींचा एक कळप आहे, तर एक हत्ती एकटा आहे. कर्नाटक राज्यातील खानापूर तालुक्यात ‘हत्ती पकडा’ मोहीम राबवली. या हत्तीला ६ घंट्यांत पकडण्यात आले. खानापूर येथे जर असे होऊ शकते, तर दोडामार्ग वन विभाग हे का करू शकत नाही ? अनेक वर्षे ‘तिलारी खोर्यातील हत्तींचा बंदोबस्त करा’, अशी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे खानापूरप्रमाणे दोडामार्ग तालुक्यात ‘हत्ती पकडा’ मोहीम राबवली जावी, अशी मागणी गवस यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
संपादकीय भूमिकाशेतकर्यांना अशी चेतावणी द्यावी लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! |