मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाच्या आदेशानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
मडगाव, २५ जानेवारी (वार्ता.) – सांडपाणी थेट नाल्यात सोडल्याच्या प्रकरणी नोटीस देऊनही हा प्रकार बंद करण्यात आलेला नाही. या प्रकरणी संबंधित ४६ आस्थापने बंद करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने दिला आहे. या आदेशाचे पालन करत असतांना गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने यापूर्वी एकूण २१ आस्थापनांना टाळे ठोकले होते. ही कारवाई आता पुढे नेतांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने आता आणखी ४ आस्थापनांना टाळे ठोकले आहे.
नावेली येथील साळपे तळे आणि साळ नदी यांचे प्रदूषण झाल्यासंबंधी गोवा खंडपिठात याचिका प्रविष्ट (दाखल) झालेली आहे. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने २४ जानेवारी या दिवशी मडगाव आणि फातोर्डा येथील ४ आस्थापनांवर कारवाई केली आहे.
संपादकीय भूमिकान्यायालयाने आदेश दिल्यावर नव्हे, तर त्या आधीच गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करणे अपेक्षित आहे. नागरिकांना त्यासाठी न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करावी लागणे मंडळासाठी लज्जास्पद ! |