शनीशिंगणापूर येथील देवस्थानचे विश्वस्त मंडळ विसर्जित करण्याचा निर्णय लवकरच ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

शनीशिंगणापूर (अहिल्यानगर) – सरकार स्थापन होण्याच्या अगोदर शनीशिंगणापूर देवस्थानचे विश्वस्त मंडळ विसर्जित करण्याविषयी विधीमंडळात चर्चा झाली होती. यानंतर या संदर्भातील सखोल अन्वेषण पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून शनीशिंगणापूर येथील देवस्थानचे विश्वस्त मंडळ विसर्जित करण्याचा लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

बावनकुळे यांनी शनीशिंगणापूरला भेट देऊन संकल्प अभिषेक आणि तेल अभिषेक करून शनीमूर्तीचे दर्शन घेतले. १ कोटी ५० लाख सदस्य संख्या असलेला भाजप १२ आणि १३ जानेवारीला शिर्डी येथे होणार्‍या अधिवेशनात जनतेचे आभार मानून पक्ष बळकट करण्यासाठी चिंतन करणार आहे. महायुतीचे सरकार १४ कोटी जनतेचा विकास करण्यासाठी वचनबद्ध आहे, असेही बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.