ब्रिटनमध्ये ‘पाकिस्तानी ग्रुमिंग गँग’चे सत्य उघडकीस आणल्यानंतर टॉमी रॉबिनसन नावाच्या एका उजव्या विचारसरणीच्या व्यक्तीला कारावास भोगावा लागत आहे. याविषयी ‘एक्स’चे प्रमुख इलॉन मस्क, प्रसिद्ध लेखिका जे.के. रोलिंग यांच्यासह अनेकजण आवाज उठवत आहेत. ‘खरे बोलल्याबद्दल टॉमी रॉबिनसन यांना कारावास भोगावा लागत आहे का ?’, असा प्रश्न इलॉन मस्क यांनी उपस्थित केला आहे, तर जे.के. रोलिंग यांनी ‘ग्रुमिंग गँग’ या शब्दावरच आक्षेप घेत त्याला ‘रेप गँग’ म्हणावे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘खरेतर ब्रिटीश सरकारमधील अनेकांना कारागृहात टाकायला हवे’, असेही मस्क यांनी म्हटले आहे, तसेच ‘ब्रिटनमध्ये पुन्हा निवडणूक घेण्यात यावी’, असेही त्यांचे म्हणणे आहेे.
‘पाकिस्तानी ग्रुमिंग गँग’ ही मूळ ब्रिटीश वंशाच्या मुलींना भुलवून, फसवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणार्यांची टोळी ! ‘ग्रुमिंग’ अर्थात् एखाद्याची विशिष्ट कृतीसाठी सिद्धता करून घेणे. ब्रिटनमधील पाकिस्तानी मुसलमान ब्रिटनमधील कोवळ्या वयातील मुलींना लक्ष्य करून त्यांच्यात स्वतःविषयी विश्वासार्हता आणि भावनिक संबंध निर्माण करतात अन् ‘लैंगिक संबंध ठेवणे ही ‘सामान्य’ गोष्ट आहे’, असे सांगून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करतात. त्यामुळेच हा प्रकार ‘ग्रुमिंग’ म्हणून ओळखला जातो. वर्ष १९९७ ते २०१३ या काळात इंग्लंडमधील रॉथरम येथे ब्रिटीश मुलांवर विशेषतः मुलींवर लैंगिक अत्याचार झाले होते. या १६ वर्षांच्या काळात १ सहस्र ४०० मुले या अत्याचारांना बळी पडली होती. ब्रिटीश सरकारी संस्थांनी केलेले अक्षम्य दुर्लक्ष, त्यांचे सामाजिक उदासीनता यांमुळे हे प्रकरण ब्रिटीश सरकारचे मोठे अपयश होते. या प्रकरणात १० ते १५ वर्षांच्या मुला-मुलींवर सामूहिक बलात्कार, त्यांची तस्करी, लैंगिक अत्याचार यांसह त्यांना अमली पदार्थ देणे, पेट्रोल प्यायला लावणे, त्यांच्यासमोर अन्य मुला-मुलींवर बलात्कार करणे, त्यांच्यासमोर हत्या करणे, यांसारखे भयंकर प्रकार झाले होते. १६ वर्षांच्या काळात अनेकदा हा विषय अनेकांनी पुढे आणण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रत्येक वेळी ब्रिटीश उच्चपदस्थ अधिकार्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले अथवा ते नाकारले. त्या काळी ज्या पालकांची मुले-मुली या प्रकरणात अडकली होती, त्यांनी या प्रकरणाचा छडा लावल्यावर पालकांनाच अटक करण्याचे आदेश सरकारी स्तरावरून देण्यात आले होते, असेही म्हटले जाते. याचे मूळ कारण म्हणजे या प्रकरणात गुंतले होते, ते पाकिस्तानी मुसलमान होते. वर्ष २०१० मध्ये बाल लैंगिक अत्याचाराचे एक प्रकरण पुढे आल्यावर त्यांतील ५ जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी करणार्या समितीने ‘बाल लैंगिक अत्याचाराचे हे एकमेव प्रकरण असून पाकिस्तानी वंशाच्या लोकांकडून बाल अत्याचार अथवा तस्करी होत असल्याचे हे उदाहरण नाही’, असे म्हटले होते. स्वतःवरील वर्णद्वेषाची टीका टाळण्यासाठी आणि राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ब्रिटनमधील सरकारी अधिकारी अन् सरकार यांनी पाकिस्तानी मुसलमानांवर कोणतीही कारवाई करणे टाळले होते. ज्यामुळे पाकिस्तानी मुसलमानांचा उद्दामपणा वाढून हा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढला; परंतु या प्रकाराला समोरे गेलेल्या मुलांना पुढे अनेक शारीरिक आणि मानसिक आघातांना सामोरे जावे लागले. काही काळाने या प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली, ज्यात १ सहस्र ३६७ गुन्हे नोंद झाले. या प्रकरणी २०८ जणांना अटक करण्यात आली आणि २० जणांना शिक्षा ठोठावण्यात आली.
हे प्रकरण मस्क यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा समोर आले आणि लोकांनी या प्रकरणी गृहमंत्रालयाद्वारे चौकशी करण्याच्या मागणीला जोर धरला; परंतु तेथील संरक्षणमंत्री जेस फिलीप यांनी सरकारी स्तरावरून या प्रकरणाची चौकशी करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगून स्थानिक स्तरावर चौकशी करण्याचे आदेश दिले. यामुळे फिलीप यांच्यावर सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आणि इलॉन मस्क यांच्यासह अनेकांनी या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली.
गेल्या अनेक दशकांपासून ब्रिटनमध्ये पाकिस्तानी लोकांची संख्या वाढली आहे. ती आता इतकी वाढली आहे की, आताच्या ब्रिटीश सरकारमध्ये ११ पाकिस्तानी खासदार आहेत आणि आताचे पंतप्रधान कीर स्टारमर यांना मते देणार्यांमध्ये ४० टक्क्यांहून अधिक पाकिस्तानी अन् बांगलादेशी मुसलमान आहेत. यामुळेच रॉथरम येथील प्रकरणाच्या संदर्भात कारवाई करण्यास ब्रिटीश सरकार ना तेव्हा धजावत होते, ना आता धजावत आहे. मतांच्या राजकारणामुळे देशातील मुलींवरील अत्याचारांविरुद्ध कोणतीही कारवाई करण्याची इच्छा नसलेल्या ब्रिटन सरकारच्या विरोधात लोक सामाजिक माध्यमांतून टीका करू लागले आहेत.
भारतातही तेच घडत आहे !
ब्रिटनमधील मुलींच्या अत्याचारांविषयी आंतरराष्ट्रीय स्तरावरून जो आवाज आज उठत आहे, तो खरे पहाता भारताच्या संदर्भातही उठवला गेला पाहिजे; कारण ब्रिटनमधील ‘पाकिस्तानी ग्रुमिंग गँग’ आणि भारतात लव्ह जिहाद्यांकडून केले जाणारे कुकृत्य यांत साम्य आहे. धर्मांध मुसलमान ‘जिहाद’ प्रत्येक देशात निराळ्या प्रकारे राबवतात, याची ही डोळ्यांसमोरील उदाहारणे आहेत. भारतावर मोगलांची झालेली आक्रमणे, भारताच्या स्वातंत्र्यानंतर काश्मीरमधील हिंदूंचा झालेला नरसंहार आणि आताही घडत असलेल्या अनेक प्रकरणांमध्ये धर्मांध मुसलमान काफिरांच्या महिला-मुली यांच्यावर कसे अत्याचार करतात, हा इतिहास उघड आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर, तसेच स्वतःला मुख्य प्रवाहातील समजणारी प्रसारमाध्यमे आणि कथित पुरोगामी या प्रकारांना ‘पाकिस्तानी वंशीय लोकांचे अत्याचार’, ‘एका जातीचा जमाव’, ‘एक समुदाय’ आदी शब्द वापरत असले, तरी सत्य काय आहे ? हे त्यांना ठाऊक आहे आणि ते लपवण्यासाठी वरवरच्या पोकळ शब्दांचा वापर करून लोकांना फसवण्याचे प्रयत्न चालू आहेत. असे असले, तरी जोपर्यंत धर्मांधांचा ‘धर्माच्या नावाखाली चालू असलेला जिहाद स्पष्टपणे उल्लेखला जाणार नाही, तोपर्यंत पायाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असेल’, हे लक्षात घेतले पाहिजे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
निर्वासित म्हणून धर्मांधांचे जगातील प्रत्येक देशात स्थायिक होणे, भारतातील मुसलमानांसाठी त्यांचा धर्म प्रथम असणे, धर्मांध मुसलमानांची ते जेथे असतील, त्या देशाविषयीची निष्ठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, हे अनेकदा उघड झाले आहे. त्यामुळेच जागतिक स्तरावर धर्मांध मुसलमानांच्या कारवाया रोखण्यासाठी जगभरात मोहीम राबवणे आवश्यक !
जगभरातील धर्मांध मुसलमानांच्या कारवाया रोखण्यासाठी जगव्यापी मोहीम राबवणे आवश्यक ! |