‘अफझलखानवधा’चा फलक जप्‍त करणार्‍या पोलिसांना बडतर्फ करा !- हणमंतराव पवार, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान

प्रतिकात्मक छायाचित्र

सांगली, १० डिसेंबर (वार्ता.) – जिल्‍ह्यातील जत येथे पोलीस प्रशासनाने ‘अफझलखानवधा’चा फलक बाजूला काढून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्‍याने हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या भावना दुखावल्‍या आहेत. त्‍यामुळे फलक जप्‍त करणार्‍या संबंधित पोलीस अधिकार्‍यांना ४ दिवसांत बडतर्फ करा, अशी मागणी श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे श्री. हणमंतराव पवार यांनी ९ डिसेंबर या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केली. या मागणीचे निवेदन त्‍यांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना दिले. श्री. हणमंतराव पवार म्‍हणाले, ‘‘जर ४ दिवसांत संबंधित पोलीस अधिकार्‍यावर कारवाई न झाली, तर अखंड श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान सांगली जिल्‍ह्याला वेठीस धरल्‍याविना रहाणार नाही, ही आमची धमकी समजा किंवा विनंती समजा.’’

संपादकीय भूमिका

अशी मागणी का करावी लागते ?