बांगलादेशामधील हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा !
अमरावती – बांगलादेशामध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत. हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. इस्कॉनचे चिन्मय कृष्णदास प्रभु यांना अटक होणे ही घटना बांगलादेशातील हिंदूंचा आवाज दडपण्याचा प्रयत्न आहे, तरी भारत सरकारने तातडीने यात हस्तक्षेप करून बांगलादेश सरकारवर दबाव आणावा, अशी मागणी अमरावती येथे हिंदु जनजागृती समिती आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांना निवेदनाद्वारे केली आहे.
या वेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य पदाधिकारी अनुप जयस्वाल, हिंदु जनजागृति समिती समन्वयक नीलेश टवलारे, संघटक प्रदीप गर्गे, हिंदु जागरणच्या सौ. रश्मी गांधी उपस्थित होत्या.