२८ नोव्हेंबर : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा ‘संजीवन समाधीदिन’ !

कोटी कोटी प्रणाम !

आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा ‘संजीवन समाधीदिन’ !

समाधी परिपूर्ण बैसले ज्ञानेश्वर !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची संजीवन समाधी ही जागृत असून ते आजही प्रचीती देतात. प्रत्येक भक्ताचा जसा भाव असेल, तसे ज्ञानदेव अनुभवाला येतात. त्या समाधी स्थानाची स्पंदने अफाट आणि अलौकिक अशी आहेत. प्रतिवर्षी हा समाधी सोहळा लाखो वारकरी मोठ्या भक्तीभावाने साजरा करतात. स्वतःचा संसारताप विसरून संतश्रेष्ठ ज्ञानदेवांना भावाश्रूंचा अभिषेक करतात. ते मौलिक आणि अमूल्य भावाश्रू संत ज्ञानेश्वरांना भावतात. ते माऊली होऊन आपल्या लेकरांना सांभाळतात. लौकिकातील माय ही जन्मदात्री, तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊली ही विश्वाची माऊली ! ती आपल्या लेकरांच्या प्रगतीसाठी सदैव हात पुढे करते.